Sahyadri Express: कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार

ट्रेन बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत होती.

28
Sahyadri Express: कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार
Sahyadri Express: कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस कोविड काळात बंद झाली होती. त्यानंतर दोन ते तीन वर्षांनंर ही ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे. प्रवाशांकडून ही ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. (Kolhapur Mumbai Sahyadri Express)

सध्या मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकामध्ये (CSMT station) प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू असल्याने तात्पुरती ही ट्रेन पुणे ते कोल्हापूर धावणार आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ही ट्रेन कोल्हापूर ते पुणे धावेल. त्यानंतर मुंबईपर्यंत तिचा प्रवास वाढवला जाणार आहे. दररोज रात्री ११.३० वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल आणि सकाळी ७.४५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुण्याहून रोज रात्री ९.४५ वाजता सुटून ही ट्रेन कोल्हापुरात पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे.

मुंबई-पुण्यावरून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनला येतात. त्यांच्यासाठी रस्तेमार्गासोबतच रेल्वेचा प्रवास आरामदायी असतो. ट्रेन बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. फेब्रुवारी २०२० पासून सह्याद्री एक्सप्रेस बंद होती. त्यामुळे प्रवाशांकडून ही ट्रेन पुन्हा सुरू करावी, यासाठी मागणी होत होती. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसेच सल्लागार समितीच्या बैठकीत पाठपुरावा केल्यामुळे प्रयत्नांना यश आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.