Kalyan News: डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी!

130
Kalyan News: डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी!
Kalyan News: डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी!

कल्याण (Kalyan News) शीळ रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळांच्या बसेस देखील अडकल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. कल्याण शीळ रोड मानपाडा येथील विद्यानिकेतन (Vidyaniketan) शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. (Kalyan News)

मेट्रोच्या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला

कल्याण (Kalyan News) शीळ रोडवर मेट्रो 12 (Metro 12) चे काम सुरू करण्यात आलंय. या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. त्यातच या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस अडकत असल्याने विद्यार्थी, रुग्णांचे देखील हाल होत आहेत. आज (१९ जून) सकाळी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात शाळेच्या बसेस अडकल्या. कल्याण शीळ रोड मानपाडा परिसरात असलेली विद्यानिकेतन शाळेच्या बसेस देखील या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. दुपारी साडेअकरा वाजून गेले तरी बस शाळेत न आल्याने अखेर शाळा प्रशासनाने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. (Kalyan News)

वाहतूक पोलीसांचे शून्य नियोजन

याबाबत विद्यानिकेतनचे संचालक विवेक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘मेट्रोचे काम सुरू आहे मात्र वाहतूक पोलिसांचा नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचबरोबर नागरिक गाड्या चालवतायत ते वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत वाहतूक पोलीसांचे शून्य नियोजन आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे. (Kalyan News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.