Jobs in India : भारतातील नोकऱ्यांचं भयानक वास्तव, ५७ टक्के नोकऱ्या २०,००० रुपयांच्या खाली

130
Jobs in India : भारतातील नोकऱ्यांचं भयानक वास्तव, ५७ टक्के नोकऱ्या २०,००० रुपयांच्या खाली
Jobs in India : भारतातील नोकऱ्यांचं भयानक वास्तव, ५७ टक्के नोकऱ्या २०,००० रुपयांच्या खाली
  • ऋजुता लुकतुके

भारतातील खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांविषयी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. वर्क इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, खाजगी नोकऱ्यांमध्ये पगारात कमालीची विषमता असून ५७ टक्के नोकऱ्यांमध्ये चक्क महिन्याला २०,००० रुपयांपेक्षाही कमी पगार मिळतो. यात डिलिव्हरी बॉयजही धरलेले आहेत. असे कर्मचारी हे गिग अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. पण, त्यांचाही विचार या अहवालात करण्यात आला आहे. (Jobs in India)

समाजातील मोठ्या वर्गाला आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचं या अहवालातून समोर येत आहे. वर्क इंडियाच्या अहवालानुसार, ५७.६३ टक्के खासगी नोकऱ्यांना २०,००० रुपये किंवा त्याहून कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. सुमारे २९.३४ टक्के खासगी नोकऱ्या या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन २०,००० ते ४०,००० रुपये इतकं आहे. या वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा होते. पण, त्यांना आरामदायी राहणीमान गाठता येत नाही. या श्रेणीत येणारे लोक आपला दैनंदिन खर्च भागवत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. (Jobs in India)

(हेही वाचा – IndusInd Bank Mutual Fund : इंडसइंड बँकेला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी)

वर्क इंडियाचे सीईओ नीलेश डुंगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी वेतनाच्या नोकऱ्यांमुळे असमानता निर्माण होत आहे. यामुळं केवळ आर्थिक आव्हानेच नाहीत तर सामाजिक स्थिरतेवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यासाठी कौशल्य विकास, वेतन सुधारणा आणि उच्च वेतनाच्या संधी निर्माण कराव्या लागतील. केवळ १०.७१ टक्के लोक ४०,००० ते ६०,००० रुपये प्रति महिना पगार मिळवू शकतात अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अशा पदांची संख्या खूपच कमी आहे. केवळ २.३१ टक्के खासगी नोकऱ्या लोकांना ६० हजार रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची संधी देऊ शकतात. (Jobs in India)

वर्क इंडिया प्लॅटफॉर्मवरील २ वर्षांच्या रोजगार आकडेवारीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील २४ लाखांहून अधिक नोकऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये फील्ड सेल्स पोझिशन्स सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या आहेत. यानंतर बॅक ऑफिस जॉब आणि टेली कॉलिंग आहे. यामध्ये ४० हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात आहे. अकाउंटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रातील नोकऱ्या देखील चांगला पगार देतात. याशिवाय शेफ आणि रिसेप्शनिस्टही चांगली कमाई करत आहेत. पण डिलिव्हरी नोकऱ्यांना सर्वात वाईट पगार असतो. (Jobs in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.