Japan Earthquake: जपान हादरलं! रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद, त्सुनामीचाही इशारा

113
Japan Earthquake: जपान हादरलं! रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद, त्सुनामीचाही इशारा
Japan Earthquake: जपान हादरलं! रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद, त्सुनामीचाही इशारा

जपान भूकंपाच्या (Japan Earthquake) धक्क्याने हादरलं आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी परिसराला बसले आहेत. जपानच्या किनारी पट्टीवरील मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आहता या भागांना त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांन सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

(हेही वाचा –Amravati News : कत्तलीसाठी जात असलेल्या १३ गोवंशांना जीवनदान)

जपानच्या सरकारी माहिती प्रसारण संस्था एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या हवामान संस्थेने आज माहिती देताना सांगितले की, भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली होती. परंतु नंतरच्या अनुमानात सुधार करून भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले गेले. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेटांना भूकंपाचा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या भूकंपाची खोली ३० किमीपर्यंत पसरल्याचेही हवामान संस्थेने सांगितले आहे. (Japan Earthquake)

(हेही वाचा –Bangladesh Protests : अस्थिरता संपल्याशिवाय कांदा निर्यात नाही; महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा निर्णय)

जपान हवामान संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास १ मीटरच्या लाटांची त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, क्युशू बेटाजवळ २० सेंटीमीटर उंच लाटा उसळत आहेत. दरम्यान क्युशू आणि शिकोकू बेटांवर असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना हानी पोहोचली आहे का? याची तपासणी प्रकल्प चालकांकडून केली जात आहे. (Japan Earthquake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.