Jai Jawan गोविंद पथकाचा १० थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला

203
Jai Jawan गोविंद पथकाचा १० थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला
Jai Jawan गोविंद पथकाचा १० थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला

मुंबई, ठाण्यात सकाळपासूनच ढाक्कुमाक्कुम, ढाक्कुमाक्कुमचे सुरू गोविंदाकडून ऐकायला मिळत आहेत. लाखोंचे बक्षीस पटकावण्यासाठी आणि आपल्याच पथकाच्या नावे रेकॉर्ड व्हावा यासाठी मुंबई, ठाण्यात मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगताना दिसतेय. तर मानवी मनोरे रचताना ‘बोल बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत गोविंदा आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहे. मात्र, स्पेनचा १० थराचा (10 Thar) विक्रम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘जय जवान गोविंद पथकाचा’ (Jai Jawan Govind Pathak) १० थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला. (Jai Jawan)

मुंबईतील सर्वाधिक उंचीचे थर रचून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या फोडण्याचा रेकॉर्ड हा जय जवान गोविंदा पथकाच्या नावे आहे. जय जवान गोविंदा पथकाची उपनगरचा राजा अशी ओळख आहे. जय जवान गोविंदा पथक दरवर्षी ९ थर रचून हंड्या फोडत असते. मात्र यंदाच्या वर्षी जय जवान गोविंदा पथक स्वतःचाचं रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झालंय. जय जवान गोविंदा पथकाचा (Jai Jawan Govind Pathak) ९ थरांचा रेकॉर्ड असून मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात ९ थरांची सलामी दिली आहे.  (Jai Jawan)

(हेही वाचा – शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – CM Eknath Shinde)

तर ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानची हंडी फोडण्यासाठी मुसळधार पावसात जय जवान गोविंदा पथकाकडून १० थर लावण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू असताना गोविंदांचा थर हा पत्त्यांसारखा कोसळ्याचे पाहायला मिळाले आणि ‘जय जवान‘ पथकाचा विक्रम थोडक्यात चुकल्याने पथकातील गोविंदाचा हिरमोड झाला. (Jai Jawan)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.