ISRO: व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनवणारी ‘ब्रिफकेस’; ‘असा’ होईल वापर

114
ISRO: व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनवणारी 'ब्रिफकेस'; 'असा' होईल वापर
ISRO: व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनवणारी 'ब्रिफकेस'; 'असा' होईल वापर

‘नासा’च्या (ISRO) मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स १०० हून अधिक दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळवीर काय खात-पीत असतील, याबद्दल सर्वांनाच जाणुन घ्यावेसे वाटते. स्पेस शटलमध्ये अन्न-पाण्याचा मुबलक साठा नेणे शक्य नाही. अशा स्थितीत अंतराळवीरांना पाणीपुरवठा करणारी ‘ब्रिफकेस’ व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली आहे. याद्वारे मानवी मूत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर होईल व ते अंतराळवीरांना पिण्यास वापरता येईल.

एक लिटर मूत्रातून ७०० मिली शुद्ध पाणी 
व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे यांच्या नेतृत्वात सुरतच्या एस. व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ. अलका मुंगरे व डॉ. अरविंद मुंगरे यांनी ‘नॅनो मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रियेने मानवी मुत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर करणारे तंत्र विकसित केले आहे. अंतराळवीरांनी लघुशंका केली की ब्रिफकेसमध्ये ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रिया होऊन शुद्ध पाणी बाहेर पडेल. एक लिटर मूत्रातून ७०० मिली शुद्ध पाणी मिळेल. डॉ. सोनवणे यांच्या टीमचे समुद्राचे खारे पाणी कमी खर्चात पिण्यायोग्य कसे करता येईल, यावर संशोधन सुरू असून लवकरच त्याची घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी दिला. (ISRO)

वेस्टमधून शेतीसाठी खत
डॉ. श्रीराम सोनवणे यांनी सांगितले, ‘नॅनो मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी’ बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालयात अत्यंत उपयोगी पडणारी आहे. संशोधकांनी हा प्रयोग यशस्वी करून तसा प्रस्ताव दिला आहे. या तंत्रज्ञानाने अमेरिकन मानकावर शुद्ध ठरलेले पाणी तर मिळेलच, पण त्यातून निघणाऱ्या वेस्टमधून शेतीत खतही मिळेल. पीएच-७.५, पीएच-८ व पीएच -९.५ असलेले फॉस्फेट मिळते, जे शेतीसाठी उपयुक्त ठरते. (ISRO)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.