ISRO : भारत २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चय

भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.

24
ISRO : भारत २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चय
ISRO : भारत २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चय

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील ‘गगनयान’ च्या क्रू एस्केप सिस्टमच्या चाचणीच्या तयारीकरिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांसोबत बैठक घेतली. यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या गगनयान मोहिमेची (Gaganyaan Mission) माहिती देण्यात आली.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. बैठकीत पंतप्रधानांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना सांगितले की 2035 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याच्या आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याच्या योजनेवर आपण काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडरवर काम करण्यास सांगितले.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्त्रायल-हमास युद्ध भडकण्याची शक्यता, इराणने दिला जोरदार इशारा )

इस्रो 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत ‘गगनयान’ मिशनच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेईल. सोप्या भाषेत, मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास, अंतराळवीराला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाईल.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मिशनचे चाचणी वाहन निरस्तीकरण मिशन-1 (TV-D1) प्रक्षेपित केले जाईल. या उड्डाणाचे अ‍ॅबॉर्ट मिशनसाठी बनवलेले सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम तीन भाग असतील. गगनयान मिशनअंतर्गत, इस्रोने पुढील वर्षाच्या सुरुवातीला गगनयान मिशनच्या पहिल्या मानवरहित मिशनची योजना आखली आहे.

गगनयान मिशनची वैशिष्ट्ये 
– चाचणी वाहन क्रू मॉड्यूल वर उचलेल. मग अबॉर्ट सारखी परिस्थिती निर्माण होईल. सुमारे 17 किमी उंचीवर, जेव्हा रॉकेट आवाजाच्या 1.2 पट वेगाने प्रवास करेल, तेव्हा क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम वेगळे होतील. क्रू मॉड्युल येथून सुमारे 2 किमी अंतरावर नेले जाईल आणि श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात उतरवले जाईल.

– या मिशनमध्ये, शास्त्रज्ञ अबॉर्ट मार्ग योग्यरित्या कार्य करत आहे की नाही याची चाचणी घेतील. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीर सुरक्षितपणे कसे उतरतील? एकूण चार चाचणी उड्डाणे पाठवायची आहेत. TV-D1 नंतर D2, D3 आणि D4 असेल.

– गगनयान मिशनची पहिली मानवरहित मोहीम पुढील वर्षाच्या सुरुवातीला नियोजित आहे. मानवरहित मिशन म्हणजे अंतराळात मानव पाठवला जाणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.