iPhone Craze : आपल्या फूलविक्रेत्या आईकडे जेव्हा मुलगा आयफोनसाठी हट्ट धरतो…

iPhone Craze : आयफोन पाहिजे म्हणून या मुलाने ३ दिवस अन्न-पाणी सोडलं होतं.

150
iPhone Craze : आपल्या फूलविक्रेत्या आईकडे जेव्हा मुलगा आयफोनसाठी हट्ट धरतो…
  • ऋजुता लुकतुके

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक फूलविक्रेती आई आपल्या मुलाला आयफोन घेऊन देताना दिसते. त्या मागची कहाणी अशी आहे की, आयफोन हवा असा हट्टच या मुलाने धरला होता. तो पूर्ण व्हावा म्हणून तो चक्क ३ दिवस जेवणाविना राहिला. अखेर गरीब आईला त्याची दया आली आणि तिने मुलाला आयफोन घेऊन दिला. व्हिडिओत दिनवाणी आई स्पष्ट दिसते. ही माता देवळाबाहेर फूलं विकून आपली आणि कुटुंबाची गुजराण करते. तर मुलगा काहीच उद्योग करत नाही. (iPhone Craze)

(हेही वाचा – DRS in Tennis : नोवाक जोकोविचला हवी टेनिसमध्ये व्हीडिओ रेफरल प्रणाली)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्या अर्थातच या आईच्या बाजूने आहेत. एकाने स्पष्ट लिहिलंय की, ‘अशावेळी चपलेनं मारावं अशा मुलाला!’

तर एकाने याचा संबंध थेट बेरोजगारीशी जोडला आहे. ‘मुलांचा दृष्टिकोन असा असेल तर बेरोजगारी वाढणारच ना. त्याला काम करायचं नाहीए. आणि आयफोन हवाय.’ ‘हे निंदनीय आहे. त्या मातेनं त्याला उपाशीच ठेवायला पाहिजे होतं आणि पैसे नाही तर चपलेनं मार द्यायला पहिजे होता,’ अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.

‘हा व्हिडिओ बघताना आईच्या चेहऱ्यावरील दु:ख बघून रडू कोसळलं,’ असं एकाने लिहिलं आहे. (iPhone Craze)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.