Iphone 16 Series: आयफोन-16 ची क्रेझ! दिल्ली-मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर तुडुंब गर्दी, पहा VIDEO

150
Iphone 16 Series: आयफोन-16 ची क्रेझ! दिल्ली-मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर तुडुंब गर्दी, पहा VIDEO
Iphone 16 Series: आयफोन-16 ची क्रेझ! दिल्ली-मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर तुडुंब गर्दी, पहा VIDEO

आयफोन 16 सीरीजची (Iphone 16 Series) विक्री आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही लोकांमध्ये नवीन आयफोनची क्रेझ पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबईतील ॲपल स्टोअर्सबाहेर चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. Apple ने आजपासून भारतासह जगातील 58 देशांमध्ये iPhone 16 ची विक्री सुरू केली आहे. आयफोन 16 ची झलक पाहण्यासाठी दिल्लीतील साकेत मॉलमधील ॲपलच्या फिजिकल स्टोअरमध्ये सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना एका ग्राहकानं सांगितलं की, “मी गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. मी काल सकाळी 11 वाजता इथे आलोय आणि आज सकाळी 8 वाजता दुकानात प्रवेश करणारा मी पहिलाच व्यक्ती आहे. मी खूप उत्साही आहे. मुंबईतील वातावरण या फोनसाठी पूर्णपणे नवीन आहे. गेल्या वर्षी मी 17 तास रांगेत उभा होतो.” (Iphone 16 Series)

कंपनीनं iPhone 16 सीरीजमधील (Iphone 16 Series) चार नवे फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये तुम्हाला डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील. दरम्यान, आयफोनच्या संपूर्ण इतिहासात ॲपलनं पहिल्यांदाच जुन्या आयफोनपेक्षा कमी किमतीत नवा आयफोन लॉन्च केला आहे. हे विशेषतः भारतात घडलं आहे. याआधी कंपनीनं गेल्या वर्षी सारख्याच किमतींत आपले फोन लॉन्च केले होते. म्हणजेच, दरांत कोणतीही वाढ झाली नाही, परंतु यावेळी संपूर्ण खेळ बदलला आहे.

आयफोन 16 सिरीजची स्टँडर्ड किंमत काय?
आयफोन 16 या फोनची (Iphone 16 Series) किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे तर आयफोन 16 प्लसची किंमत 899 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 75500 रुपये असेल. आयफोन 16 प्रो (128 जीबी) मॉडेलची किंमत 999 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 83,870 रुपये असणार आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) मॉडेलची किंमत 1199 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये असणार आहे.

भारतात आयफोन 16 ची किंमत काय?
प्रत्येक देशात तेथील स्थानिक कररचनेनुसार आयफोन 16 सिरीजच्या (Iphone 16 Series) फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे. भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे. तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल. आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल. तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.