Indian Navy MoU: भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार

सागरी उपकरणे आणि यंत्रणा यांच्या स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय नौदल आणि बीईएमएल यांचे एकत्रित करार संपन्न झाले.

88
Indian Navy MoU: भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार
Indian Navy MoU: भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार

भारतीय नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सागरी अभियांत्रिकी उपकरणांचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत बीईएमएल (BEML) या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘वर्ग अ’ श्रेणीतील आणि भारताच्या आघाडीच्या संरक्षण आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन कंपनीने 20 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदलाशी (Indian Navy) सामंजस्य करार केला आहे. (Indian Navy MoU)

नवी दिल्ली येथील नौदलाच्या मुख्यालयात भारतीय नौदलाचे एसीओएम (डी आणि आर) रियर अॅडमिरल के श्रीनिवास (Rear Admiral K Srinivas) आणि बीईएमएलचे संरक्षण विभाग संचालक अजित कुमार श्रीवास्तव (Ajith Kumar Srivastava) यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा उपक्रम म्हणजे महत्त्वपूर्ण सागरी अभियांत्रिकी उपकरणे तसेच यंत्रणा यांची स्वदेशी रचना, विकास, निर्मिती, चाचणी आणि उत्पादनविषयक पाठबळासाठी द्विपक्षीय सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. (Indian Navy MoU)

(हेही वाचा – Water Crisis : बोरिवली, कांदिवलीतील जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढा, महापालिका आयुक्तांचे निर्देश)

भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला (Atmanirbhar Bharat) अनुसरत, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबन बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे तसेच परदेशी ओईएमएस (अस्सल उपकरणे निर्माते) वरील अवलंबित्व कमी करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

हेही पाहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.