Indian Industrial Output : भारताचं औद्योगिक उत्पादन २२ महिन्यात पहिल्यांदाच घटलं

111
Indian Industrial Output : भारताचं औद्योगिक उत्पादन २२ महिन्यात पहिल्यांदाच घटलं
Indian Industrial Output : भारताचं औद्योगिक उत्पादन २२ महिन्यात पहिल्यांदाच घटलं
  • ऋजुता लुकतुके

जास्तीचा पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर यामुळे देशाच्या औद्योगिक उत्पादनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. २२ महिन्यात पहिल्यांदा औद्योगिक उत्पादन दर कमी झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी देशाची औद्योगिक उत्पादनाची ताजी आकडेवारी जारी केली. यात ऑगस्ट महिन्यातील उत्पादन ०.१ टक्क्यांनी कमी झालं आहे. जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ४.७ इतकं होतं. खाण उद्योग आणि ऊर्जा उद्योगाचं उत्पादन घटल्यामुळे सर्वंकष आकड्यांवर परिणाम झाला आहे. (Indian Industrial Output)

यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर उणे ४.१ इतका होता. एप्रिल ते ऑगस्ट तिमाहीचा विचार केला तर औद्योगिक उत्पादनात ४.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. पण, गेल्यावर्षी याच कालावधीत ही वाढ ६.२ टक्के इतकी होती. यंदा पडलेला अतिरिक्त पाऊस आणि काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे उत्पादन घटल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे. खासकरून खाण उद्‌योग, ऊर्जा निर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणी या क्षेत्रांना पावसाचा फटका बसला. (Indian Industrial Output)

(हेही वाचा – होमगार्ड्सना आता मिळणार देशातील सर्वाधिक मानधन; Devendra Fadnavis यांची घोषणा)

‘अतिरिक्त पाऊस हे कारण तर होतंच. शिवाय ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणीही या काळात घटली. त्याचा परिणामही उत्पादनावर जाणवला. पण, ग्रामीण भागात चांगला पाऊस झाल्याचे परिणाम येत्या तिमाहीत दिसतील. तिथे मागणी वाढून उत्पादन वाढवण्याची गरज निर्माण होईल,’ असं क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज धर्मकीर्ती जोशी यांनी सांगितलं. ताज्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांक काढण्यासाठी ज्या २३ क्षेत्रातील उत्पादनाचा आढावा घेण्यात येतो, त्यातील ११ क्षेत्रांमध्ये तिमाहीत मंदी होती. अन्न प्रक्रिया उद्योग, शीतपेये, कागद निर्मिती भांडवली वस्तू अशा क्षेत्रांमध्ये मंदी दिसून आली. तर पायाभूत सुविधा उभारणी उद्योगासाठी लागणारा कच्चा मालही मागणी अभावी फारसा तयार झाला नाही. (Indian Industrial Output)

भारतात येणारे दिवस हे सणासुदीचे तसंच नवीन कृषि हंगामाचे आहेत. ते पाहता वस्तू व सेवांची मागणी वाढून औद्योगिक आकडेही सुधारतील असा अंदाज आहे. (Indian Industrial Output)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.