Indian Food इतर देशातील पदार्थांपेक्षा सर्वोत्तम; ‘WWF’च्या अहवालात नेमकं काय?

181
Indian Food इतर देशातील पदार्थांपेक्षा सर्वोत्तम; ‘WWF’च्या अहवालात नेमकं काय?
Indian Food इतर देशातील पदार्थांपेक्षा सर्वोत्तम; ‘WWF’च्या अहवालात नेमकं काय?

आहार (Indian Food) जेवढा सात्त्विक तेवढा आपल्यासाठी अधिक चांगला. भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे की, आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो. मन आणि बुद्धी सात्त्विक करण्यासाठी आहार सुद्धा सात्त्विक असावा. भारतीय आहार (Indian Food) हा एक परिपूर्ण आहार मानतो जातो. आता वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (WWF) जारी केलेल्या लिव्हिंग प्लॅनेटच्या २०२४ च्या अहवालामध्ये भारतीय अन्न व्यवस्था जगभरातील देशांपेक्षा पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम अन्न व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे.

(हेही वाचा-Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सॅल्यूट, पहा व्हिडीओ)

या अहवालात भारतातील अन्न (Indian Food) व्यवस्थेची (Indian Food System) प्रशंसा करण्यात आली आहे. जगभरातील देशांमध्ये भारताचा अन्न वापराचा नमुना सर्वात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच जगभरातील सर्व देशांनी भारताचा हा पॅटर्न स्वीकारला तर २०५० पर्यंत पृथ्वीवरील होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होतील, असंही अहवालात(WWF) म्हटलं आहे. दरम्यान, भारतानंतर इंडोनेशिया, चीन, जपान आणि सौदी अरेबिया या देशांना सर्वोत्तम अन्नप्रणालींमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तसेच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील आहार पद्धतींना सर्वात खराब दर्जा देण्यात आला आहे. (Indian Food)

(हेही वाचा-Nashik News: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये फायरिंगचा सराव करताना स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू)

भारतातील लोकांच्या बाजरीचे सेवन करण्याच्या पद्धतीचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते हवामानासाठीही चांगले असल्याचं अहवालात(WWF) म्हटलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा बाजरी उत्पादक देश असून जो जागतिक उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के आहे. बाजरीच्या वापराला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरु असल्याचं म्हटलं आहे. (Indian Food)

(हेही वाचा-२१ वे शतक आमचे; भारत-आसियान शिखर परिषदेत PM Narendra Modi यांचे उद्गार)

सर्व देशांनी भारतातील अन्न व्यवस्था किंवा खाद्यपदार्थ स्वीकारल्यास २०५० पर्यंत आपल्या पृथ्वीवरील ८४ टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. याचा अर्थ १६ टक्के संसाधने वापरली जाणार नाहीत. त्यामुळे जागतिक तापमानवाढही कमी करण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. तसेच १.५° डिग्री सेल्सियसपेक्षा खूपच कमी उष्णता उत्सर्जित होईल. त्यामुळे पर्यावरण सुधारेल, असंही या अहवालामध्ये (WWF) म्हटलं आहे. (Indian Food)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.