India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून

India Monsoon : ३० सप्टेंबरला संपलेल्या मान्सून हंगामात ९३४.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

97
India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून
  • ऋजुता लुकतुके

३० सप्टेंबरला यंदाचा मान्सून हंगाम संपला आहे. दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा यंदा ८ टक्के मान्सून जास्त झाला आहे. देशात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली. २०२० पासूनचा हा देशातील सर्वोत्तम मान्सून आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचे यंदाचे आकडे सोमवारी जाहीर केले आहेत. मध्य भारतात सरासरीपेक्षा १९ टक्के मान्सून जास्त झाला आहे. तर दक्षिण भारतात १४ टक्के आणि वायव्य भारतात ७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. (India Monsoon)

(हेही वाचा – Sunita Williams आणि बुच विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्याच्या हालचाली सुरु)

पूर्व आणि ईशान्य भारतात मात्र सरासरीपेक्षा १४ टक्के पाऊस कमी झाला आहे. जून ते सप्टेंबर या हंगामाचा विचार केला तर जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला. जुलै महिन्यात तो ११ टक्क्यांनी वाढला. ऑगस्ट महिन्यात १५.६ टक्के आणि सप्टेंबर महिन्यात १०.६ टक्क्यांनी पाऊस जास्त झाला. २०२३ मध्ये भारतात ८२० मिमी इतका पाऊस झाला होता. देशाचा सरासरी मान्सून हा ८६८.६ मिमी इतका आहे. (India Monsoon)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाविषयीचा निर्णय केंद्र सरकारच घेणार, बीसीसीआयचा पुनरुच्चार)

अलीकडच्या काळात २०२० मध्ये ९५८ मिमी इतका सर्वाधिक पाऊस देशात झाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये ८७० मिमी आणि २०२२ मध्ये ९२५ मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने सुरुवातीला व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. या हंगामातील समाधानकारक पावसामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, देशातील जवळ जवळ ५२ टक्के जमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शिवाय महत्त्वाची धरणं भरली तर त्यातून देशाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि वीज निर्मितीही अवलंबून असणार आहे. (India Monsoon)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.