Child Sexual Abuse : मुंबईत बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे

136
Child Sexual Abuse : मुंबईत बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे
Child Sexual Abuse : मुंबईत बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे

बदलापूर येथे २ चिमुरड्यांवर शाळेतच झालेल्या अत्याचाराने संताप व्यक्त होत आहे. अशातच अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यंदा मे अखेरीपर्यंत मुंबई पोलिसांनी ५०९ गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ४६५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. (Child Sexual Abuse)

(हेही वाचा – Badlapur School Case : आंदोलकांच्या दगडफेकीत रेल्वे पोलीस आयुक्तांसह 10 पोलीस जखमी)

मुंबईतही गेल्या आठवड्यात शिक्षकांनीच विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. कांदिवलीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात १४ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून स्वतः या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

धारावी येथे एका शिकवणी शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या ३७ वर्षीय खासगी शिकवणी शिक्षकाला धारावी पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. आरोपीने पीडित मुलाला अश्लील चित्रफीत दाखवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यापर्यंत पोक्सो अंतर्गत ५०९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात बलात्काराच्या २३२, विनयभंगाच्या २६२, छेडछाडीचे १२ व इतर ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. (Child Sexual Abuse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.