शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल

128
शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल
शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल

शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protests) हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती (Bangladesh Protests) निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती, असे विधान खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी केले आहे.

(हेही वाचा – एक्सप्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे Central Railway ची वाहतूक विस्कळीत)

कंगना रणौत यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत एक विधान केले आहे. “शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होते, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असेही कंगना रनौत म्हणाल्या.

काँग्रेसने केली कारवाईची मागणी

कंगना रनौत यांच्या या विधानानंतर पंजाबमधील काँग्रेस (Congress) नेते राजकुमार वेरका यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगना रनौत यांनी अनेकदा अशा प्रकारे वादग्रस्त विधाने केली आहेत. मागेही त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंती करतो त्यांनी कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्यावर गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी, असे राजकुमार वरेका यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री कंगणा रनौत या त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांवर सडकून टीकाही केली आहे. दरम्यान कंगना रणौत यांनी आता शेतकरी आंदोलनाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.