मंदिर विषयक जागरणात हिंदी विवेकची भूमिका महत्त्वाची – Milind Parande

102
मंदिर विषयक जागरणात हिंदी विवेकची भूमिका महत्त्वाची - Milind Parande
मंदिर विषयक जागरणात हिंदी विवेकची भूमिका महत्त्वाची - Milind Parande

यशस्वी राजनीति हिंदूंना शिव्या शाप देऊन यशस्वी होत नाही, याचा प्रत्यय आपल्याला आला आहे. हिंदू मंदिरांच्या बाबतीत सरकारने पक्षपात केलाय याबद्दल हिंदूंनी विचार करणे गरजेचे आहे. चर्च मज्जिद आदींच्या बाबतीत सरकारी धोरण वेगळे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या बाबतीत वेगळे, हा पक्षपात हिंदूंवर अन्याय करतो. सरकारी नियंत्रणातून मंदिरांची मुक्ती होणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व राज्यांमध्ये समाज प्रबोधन करणे ही संघटनांची जबाबदारी आहे. असे होणार नाही तोपर्यंत समस्येचा मार्ग निघणे कठीण आहे. हिंदुत्व समजण्यासाठी अशा मौलिक ग्रंथ रुपी संग्रहाचा ठेवा अमूल्य आहे. यामध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गाचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. ते दादर येथील स्वामीनारायण योगी मंडप येथे संपन्न झालेल्या हिंदी विवेक मासिक पत्रिका प्रकाशित ‘मंदिर: राष्ट्र के ऊर्जा केंद्र’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.  (Milind Parande)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल ? वाचा सविस्तर…)

हिंदू मंदिराच्या मूर्ती मागील तत्त्वाला मानतो म्हणून मंदिर नष्ट केले तरी विदेशी त्यातील देवत्व नष्ट करू शकले नाहीत, यातच हिंदू धर्माचे महात्म्य पाहायला मिळते. मंदिर समाज व्यवस्थेतील एक भव्य शक्ती आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मंदिरांचे मोठे योगदान आहे. मंदिरे उभारली म्हणजे ऊर्जा केंद्र बनतात असे नाही, तर उपासना, साधना, जागृती झाली पाहिजे. मंदिर व्यवस्थेचा विकास होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (Milind Parande)

मंदिर व्यवस्थेवर बोलताना परांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माता अहिल्याबाई तसेच प्रभू श्रीराम व सीता मातेच्या आठवणींना उजाळा दिला. हिंदुत्वाचे महत्त्व सांगताना मुलांच्या प्रश्नांना पालकांकडे उत्तरे नाहीत त्यामुळे याचे महत्त्व आजच्या भाषेत मुलांना समजावणे गरजेचे आहे तशी समाज व्यवस्था हवी. हिंदू रक्षणामध्ये मंदिरांची भूमिका नेहमीच राहिली आहे. अध्यात्मिक शक्ती आराधना आपल्याला मंदिराशी जोडते. संघर्षाच्या कालखंडात विकृती आली परंतु आपल्या मंदिर व्यवस्थेने समाज व्यवस्था मजबूत राहिली. विश्वात कमजोरी, गरिबीची पूजा होत नाही त्यामुळे मंदिर जागरण मध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.  (Milind Parande)

(हेही वाचा- UP मध्ये Jama Masjid ची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ASI पथकावर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज)

मुंबई दादर येथील श्री स्वामीनारायण योगी मंडप सभागृहात हिंदी विवेक मासिक पत्रिका प्रकाशित ‘मंदिर : राष्ट्र के ऊर्जा केंद्र’ ग्रंथ प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मूर्ती विशेषज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, झा कंस्ट्रक्शन प्रा. लि. च्या डायरेक्टर मनोरमा झा, विश्व हिंदू परिषद चे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर, गोवर्धन इको व्हिलेज चे केशव चंद्र प्रभू, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, हिंदी विवेक चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच यावेळी विश्व हिंदू परिषद प्रकाशित वर्ष 2025 च्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (Milind Parande)

हिंदी विवेक चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत हिंदी विवेकच्या पंधरा वर्षाच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. हिंदी विवेकने प्रस्तुतीकरणात नेहमीच समाजाचे हित, सकारात्मकता अग्रगणी ठेवली. अनेक आक्रमणानंतर ही सनातन परंपरा, संस्कृती, सांस्कृतिकता टिकून आहे .यात मंदिरातून समाज मनावर झालेल्या संस्काराचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच “मंदिर: राष्ट्र के ऊर्जा केंद्र ” या ग्रंथाचे निर्मिती झाली आहे. यावेळी त्यांनी हिंदी विवेकच्या सहयोग दातांचे आभार मानले तसेच हिंदी विवेकला भारतात पोहोचविण्याचे कार्य निरंतर असेच सुरू राहील असा विश्वास दिला.  (Milind Parande)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात महायुतीचा डंका; विजया मागची नेमकी कारणे काय ?)

यानंतर हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी अध्यात्मिक शक्ती या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास मंदिर निर्माण अशक्य नाही. मंदिरे केवळ पैशांनी उभी राहत नाहीत तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व व्यवस्थेची आवश्यकता असते. त्यामुळे समाज उभा राहिला तर मंदिर उभे राहतात, समाज भग्न झाला तर मंदिरे भग्न झाली म्हणून समजा. मंदिरांची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यासाठी समाज जागरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (Milind Parande)

यावेळी बोलताना स्थापत्य व मूर्ती विशेषज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी मंदिर व्यवस्था समजावून सांगितली. मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. गवंडी पासून अनेक घटक मंदिर उभारणीत समाविष्ट असतात, हे घटक एकत्र येऊन मंदिराची निर्मिती होते. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना प्रथम मंदिराची प्रदक्षिणा घ्यावी त्याबाबत शिक्षण घ्यावं. बहिरदेव पूजा झाली की त्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा म्हणजे आपल्याला आपण मंदिराची संपूर्ण माहिती आत्मसात करून प्रवेश मिळवतो. यावेळी त्यांनी मंदिरावर असणाऱ्या 32 सुरसुदरींचे महत्त्व सांगितले. तसेच मंदिरातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो व त्याचे महत्त्व स्पष्ट केले. (Milind Parande)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; मुख्यमंत्री‍पदासाठी पुन्हा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?)

कार्यक्रमादरम्यान  झा कन्स्ट्रक्शन चे एमडी रामसुंदर झा, मनोरमा झा, गोवर्धन इको व्हिलेजचे केशव चंद्र प्रभू, विश्व हिंदू परिषद चे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर, टेम्पल कनेक्ट चे संस्थापक गिरीश कुलकर्णी तसेच हिंदी विवेक चे प्रतिनिधी दत्तात्रय ताम्हणकर, महेश जुन्नरकर यांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  (Milind Parande)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर यांनी केले. मानसी राजे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.