IMA Survey On Doctors Safety : ३५ टक्‍के महिला डॉक्‍टर रात्रपाळी करायला घाबरतात; इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्वेक्षण

82
IMA Survey On Doctors Safety : ३५ टक्‍के महिला डॉक्‍टर रात्रपाळी करायला घाबरतात; इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्वेक्षण
IMA Survey On Doctors Safety : ३५ टक्‍के महिला डॉक्‍टर रात्रपाळी करायला घाबरतात; इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्वेक्षण

कोलकाता येथील ‘राधा-गोविंद’ (आर्.जी) कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरवर बलात्‍कार करून तिची हत्‍या केल्‍याच्‍या घटनेनंतर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आय.एम्.ए.ने) ऑनलाइन सर्वेक्षण केले. यात सहभागी झालेल्‍या सुमारे ३५ टक्‍के महिला डॉक्‍टरांनी सांगितले आहे की, त्‍यांना रात्रपाळी करतांना सुरक्षित वाटत नाही. (IMA Survey On Doctors Safety)

एका महिला डॉक्‍टरने असेही मत नोंदवले की, ती नेहमी तिच्‍या हँडबॅगमध्‍ये चाकू आणि मिरपूड स्‍प्रे ठेवते; कारण कामाची खोली अंधार्‍या ठिकाणी आहे. (IMA Survey On Doctors Safety)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election: विधानसभेसाठी एकूण मतदारांची संख्या वाढली, मतदार नोंदणीत ‘लाडक्या’ बहिणी आघाडीवर!)

काही डॉक्‍टरांनी आपत्‍कालीन कक्षात गैरवर्तनाविषयी तक्रारी केल्‍या. एका महिला डॉक्‍टरने सांगितले की, गर्दीच्‍या वेळी आपत्‍कालीन कक्षात त्‍यांना अनेकदा ‘वाईट स्‍पर्शा’चा सामना करावा लागला. (IMA Survey On Doctors Safety)

‘केरळ राज्‍य युनिट’च्‍या ‘रिसर्च सेल’ने हे सर्वेक्षण केले होते. त्‍याचे अध्‍यक्ष डॉ. राजीव जयदेवन् म्‍हणाले की, २२ राज्‍यांतील डॉक्‍टरांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. सर्वेक्षणासाठी आवश्‍यक माहिती गूगल फॉर्मद्वारे भारतभरातील सरकारी आणि खाजगी डॉक्‍टरांना पाठवण्‍यात आली होती. २४ घंट्यांत ३ सहस्र ८८५ प्रतिक्रिया प्राप्‍त झाल्‍या. (IMA Survey On Doctors Safety)

(हेही वाचा- केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांच्यावर हल्ला, आपचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात)

डॉ. जयदेवन् पुढे म्‍हणाले की, आतापर्यंतच्‍या सर्वेक्षणातून जे काही समोर आले आहे त्‍यात सुरक्षा कर्मचार्‍यांची संख्‍या वाढवणे, सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवणे, केंद्रीय सुरक्षा कायदा (सीपीए) लागू करणे, सुरक्षितता वाढवण्‍यासाठी अलार्म सिस्‍टमचा समावेश करणे आणि लॉकसह सुरक्षित ‘ड्युटी रूम’ इत्‍यादी गोष्‍टींचा समावेश आहे. (IMA Survey On Doctors Safety)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.