IKEA : कॅरी बॅगसाठी 20 रुपये घेणे IKEA ला पडले महागात; 150 पट भरपाई द्यावी लागणार

24
IKEA : कॅरी बॅगसाठी 20 रुपये घेणे IKEA ला पडले महागात; 150 पट भरपाई द्यावी लागणार
IKEA : कॅरी बॅगसाठी 20 रुपये घेणे IKEA ला पडले महागात; 150 पट भरपाई द्यावी लागणार

स्वीडिश फर्निचर कंपनी IKEA ने एका महिला ग्राहकाकडून कॅरी बॅगचे पैसे आकारले. (IKEA ) IKEA विरोधात महिला ग्राहकाने ग्राहक कोर्टात दाद मागितली. तेव्हा या 20 रुपयांच्या बदल्यात 3000 रुपयांचा फटका बसला आहे. बेंगळुरू न्यायालयाने Ikea ला महिला ग्राहकाला ₹3,000 देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक संगीता बोहरा यांच्याकडून 6 ऑक्टोबर 2022 रोजी Ikea च्या नागासंद्र येथील दुकानातून कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारण्यात आले. यानंतर संगीता यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. बोहरा यांनी दुकानातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या आणि कॅरीबॅग मागितली होती. या कॅरीबॅगसाठी कंपनीने त्याच्याकडून 20 रुपये आकारले होते.  कागदी पिशवी वर कंपनीचा लोगोही छापलेला होता. (IKEA )

(हेही वाचा – Pizza Delivery : पिझ्झा डिलिव्हरीला उशीर झाल्याने हवेत गोळीबार; काय आहे प्रकरण)

बोहरा यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना कंपनीचा लोगो असलेल्या कॅरीबॅगसाठी  20 रुपये आकारल्याबद्दल विचारणा केली. कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारणे ही एक चुकीचा व्यवहार असल्याचा दावा त्यांनी केला. खरेदी करण्यापूर्वी तिला या शुल्काबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. बोहरा यांनी 2022 मध्ये ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यांनी केलेल्या याचिकेत कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

IKEA ने म्हटले आहे की ग्राहकांकडून स्वतःच्या ब्रँडेड बॅगसाठी शुल्क आकारणे चुकीचे नाही. छुपे दर लावण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूंची विक्री केली जात नसल्याचे कंपनीने म्हटले. कागदी पिशव्यांसह त्याच्या सर्व उत्पादनांची माहिती स्टोअरच्या वेगवेगळ्या ठिकाणी दर्शवली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. (IKEA )

ग्राहक मंचाला धक्का 

ग्राहक तक्रार निवारण मंचाने बोहरा यांच्या बाजूने निर्णय दिला. तसेच Ikea ला 3,000 रुपये भरण्याचे आदेश दिले. कंपनीचा लोगो असलेल्या कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारणे ही चुकीची व्यापार प्रथा असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कमिशनने असेही म्हटले आहे की, कंपनीने ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी कागदी पिशवीच्या शुल्काविषयी माहिती द्यावी.
बेंगळुरू येथील शांतीनगर येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की,

– या मोठ्या मॉल्स/शोरूम्सद्वारे प्रदान केलेली सेवा पाहून आम्हाला धक्का बसला आहे. ग्राहकाने सेवेचा अभाव आणि अनुचित व्यापार पद्धतीची तक्रार केली आहे. तक्रारदाराला नुकसान भरपाई मिळावी.

– ग्राहकांना स्वतःची पिशवीही नेण्याची परवानगी या दुकानात नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. – ‘एखाद्या ग्राहकाला वेगवेगळ्या दुकानांतून सुमारे 15 (वस्तू) खरेदी करायच्या असतील, तर त्यासाठी त्याने घरून 15 कॅरीबॅग आणण्याची अपेक्षा करू शकत नाही.

– ग्राहक तक्रार निवारण मंचाने स्वीडिश कंपनीला 30 दिवसांच्या आत आदेशांचे पालन करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ग्राहकाला व्याजासह 20 रुपयांची नुकसानभरपाई म्हणून 1,000 रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून 2,000 रुपये देण्याचे आदेश दिले. (IKEA )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.