Railway : भारतात 2024 पर्यंत धावणार हायड्रोजन ट्रेन

आगामी 2024 पर्यंत भारतात हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू होईल.

149

भारतात आगामी 2024 पर्यंत हायड्रोजन ट्रेन धावतील अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हावडा-पुरी वंदे भारत ट्रेनने प्रवास केल्यानंतर ते बोलत होते.

ओडिशाला गुरुवारी पहिला वंदे भारत ट्रेन मिळाली, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ओडिशातील पुरी येथून निघालेली गाडी रात्री 9.30 वाजता पश्चिम बंगालमधील हावडा शहरात पोहोचल्यावर वंदे भारतचे भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पुरी ते हावडा असा प्रवास केला. तत्पूर्वी ट्रेन बंगालमधील खडपूरमध्ये दाखल झाली, तिथे ट्रेनचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे मंत्रालय हायड्रोजन ट्रेनवर काम करत आहे. आगामी 2024 पर्यंत भारतात हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू होईल. यासोबतच 500 किलोमीटरहून अधिक अंतराच्या वंदे भारतमध्ये स्लीपरच्या योजनेवरही मंत्रालय काम करत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. लवकरच लोक वंदे भारतमध्ये स्लीपर क्लासचा आनंद घेतील.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिर पाडून बांधलेली मशीद; मराठ्यांनी केला जीर्णोद्धार; नाशिकच्या ज्योतिर्लिंगाचा काय आहे इतिहास?)

जून महिन्या अखेर संपूर्ण देश वंदे भारताशी जोडला जाईल, असे ते म्हणाले. मंत्रालय 400 वंदे भारत चालवेल. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांना देखील लवकरच वंदे भारताची भेट दिली जाईल. याचबरोबर ईशान्येला राष्ट्रीय राजधानीशी जोडण्यासाठी मोठ्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.