BMC School किती सुरक्षित? शाळांच्या देखभालीसाठी खासगी कर्मचारी, तर सीसीटीव्ही कॅमेरांचाही नाही पत्ता

161
BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!

बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील दुर्दैवी घटनेनंतर मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसवण्यात आले नसून महापालिकेच्या शालेय इमारतींची स्वच्छता, सुरक्षा आणि परिसर स्वच्छतेसह इमारत देखभालीसाठी खासगी कंत्राट कंपनीची निवड केली असून या कंपनीच्यावतीने मनुष्यबळाचा वापर केला जात आहे. मात्र, महापालिकेच्या शाळांमध्ये खासगी कंपनीचे कर्मचारी कार्यरत असल्याने महापालिका शाळा किती सुरक्षित आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC School सर्व शालेय इमारतींना स्वच्छता, सुरक्षा आणि परिसर स्वच्छता, इमारत देखभाल आदी प्राधान्याने करण्यात यावी अशाप्रकारची शिफारस निवृत्त न्यायामूर्ती धनुका यांच्या समितीने केल्यानंतर महापालिकेने अपुरा मनुष्यबळ असल्याने इमारत देखभालीसाठी खासगी कंपनीच्या मदतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २००८ पासून महापालिकेच्या इमारतींची देखभाल खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जात आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या कंत्राटाची मुदत २०१९मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना मुदतवाढ देत सन २०२२मध्ये पुढील तीन वर्षांकरता मनुष्यबळ पुरवण्यासाठी संस्थांची निवड केली आहे. यामध्ये सात परीमंडळांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक प्रत्येक शालेय इमारतींची देखभाल करण्यासाठी करण्यात आली. यासाठी सुमारे ३९१ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून या देखभालीच्या कामांसाठी मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस, मेसर्स ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बीवीजी इंडिया लिमिटेड आदी कंपनींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये क्रिस्टल कंपनीकडे तीन परिमंडळ आणि उर्वरीत दोन कंपन्यांकडे प्रत्येक दोन परिमंडळांची जबाबदारी आहे.

(हेही वाचा – मविआला दलित मुस्लिमांची मते मिळणार नाहीत; Raj Thackeray असे का म्हणाले?)

शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा करणार विचार

बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील दुर्देवी घटनेनंतर महापालिका शाळांमधील (BMC School सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील मुलींची सुरक्षा महत्वाची असून या सर्व खासगी कंपनीकडे पुरुष कर्मचाऱ्यांचीच अधिक असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सन २०१६ पासून महापालिका शालेय इमारतींमध्ये सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी हात असून सन २०२४ उजाडले तरी महापालिका शाळांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये बदलापूर सारखी घटना घडल्यास त्याचे पुरावे कसे शोधणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्याबाबतची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कार्यादेश दिले आहे. त्यानुसार शहर भागातील सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचे कामाला सुरुवात केली जाईल. पहिल्या टप्प्यातील शहर भागातील एक ते दोन शाळांमध्ये (BMC School हे कॅमेरे बसवण्याची प्रक्रिय पूर्ण झाली असून उर्वरीत शाळांमध्ये बसवण्यात येत आहे. तसेच याचा अनुभव विचारात घेत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – BMC School : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास)

तसेच महापालिका शाळांच्या (BMC School देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही आता शासनाच्या परिपत्रकानुसार पोलिसांच्या माध्यमातून चारित्र शुद्ध प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत बुधवारी सर्व शालेय विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या असून याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात येत आहे. यामध्ये मुलींसाठी महिला अटेंड्सच असावे अशाप्रकारचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांचेही पेट्रोलिंग प्रत्येक शाळांमध्ये असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.