Hindustan Post Exclusive News : G 20 शिखर परिषद; ध्वज खरेदीवर सव्वा तीन कोटींचा खर्च

507
Hindustan Post Exclusive News : G 20 शिखर परिषद; ध्वज खरेदीवर सव्वा तीन कोटींचा खर्च
Hindustan Post Exclusive News : G 20 शिखर परिषद; ध्वज खरेदीवर सव्वा तीन कोटींचा खर्च
  • सचिन धानजी, मुंबई

जी-२०( G-20) परिषदेच्या आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाल्याने त्यानिमित्त मुंबईसह राज्यातील इतर शहरात  १४ बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या निमित मुंबईत उपस्थित राहणाऱ्या शिष्टमंडळाच्या बैठकांसाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये जी २० राष्ट्रांच्या राष्ट्रीय ध्वज लावण्यात आले होते.  मुंबईत महापालिकेच्यावतीने या देशांच्या १६६० ध्वजांची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी तब्बल सव्वा तीन कोटी रुपये  खर्च केले असून या प्रत्येक ध्वजांसाठी महापालिकेने तब्बल दोन हजार रुपये मोजले असल्याची माहिती समोर आली आहे. (Hindustan Post Exclusive News)

(हेही वाचा- Action on Hawkers : फेरीवाल्यांवरील अधिक होणार तीव्र; १५ सप्टेंबर नंतर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याची होणार नाही हिंमत!)

जी २० गटाच्या देशांची शिखर परिषद मुंबई येथे  १२ डिसेंबर  २०२२ पासून सुरु झाली होती. त्याअनुषंगाने मुंबई येथे सन  २०२२ – २३मध्ये  जी २० (G20) कार्यक्रमाअंतर्गत मुंबईत सुशोभिकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. ज्यामध्ये शिष्टमंडळांच्या बैठकीच्या मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी आणि विकास तसेच विद्युत रोषणाई, रंगरंगोटीसह अनेक कामे हाती घेण्यात आली होती.  त्यामुळे या कार्यक्रमासाठी सदस्य असलेल्या एकूण  २० सदस्य देशांचे राष्ट्रीय ध्वज पोलसहीत मुंबई राष्ट्रीय विमानतळ ते मंत्रालय मार्गावरील अंधेरी पूर्व, सांताक्रुझ ते वांद्रे पूर्व,  वरळी, मलबार हिल, गिरगाव चौपाटी आदी परिसरातील हद्दीत महापालिकेच्या एकूण सहा  प्रशासकीय वॉर्डमधील रस्त्यांच्या दूर्तफा फडकविण्याकरीता साधारण १०० नग प्रती देश याप्रमाणे कमीत कमी ४ फूट बाय ६ फूट आकाराचे एकूण २००० राष्ट्रीय ध्वज पोलसहीत उभारण्यात आल्याचा  दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. (Hindustan Post Exclusive News)

माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनसार, या जी २० परिषदेत सहभागी झालेल्या देशांच्या राष्ट्रीय ध्वजांची पोलसहित उभारणी करण्यासाठी स्वारस्य अभिरुजी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये प्रशासनाच्यावतीने तातडीने या ध्वजांची खरेदी आणि उभारणी करण्यासाठी प्रत्येक देशाच्या प्रती ध्वजासाठी कमीत कमी २१, ६०० रुपये ते अधिकाधिक २९,९०० रुपयांचा दर निश्चित केला होता. या मध्ये प्रांरभी लोखंडी पाईपचा समावेश होता, परंतु त्यानंतर प्रशासनाने हा पाईप लोखंडी ऐवजी जी आय पोलचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यातील एका कंपनीने १९, ७०० रुपयांची बोली लावल्याने त्या कंपनीला १ हजार पोलसह ध्वज उभारणीचे काम देण्यात आले आले तर उर्वरीत दोन कंपन्यांना प्रत्येकी ५०० ध्वज पोलसह उभारण्यासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेत त्यांच्यावर याची जबाबदारी सोपवली (Hindustan Post Exclusive News)

(हेही वाचा- Badlapur School Case : रेल्वेबाहेरील प्रश्नासाठी बदलापुरात रेल रोको; रेल्वे सेवेवर कसा झाला परिणाम?)

यात पात्र ठरलेल्या अथर्व हेल्थ टेक इंडिया प्रा.लि. या कंपनीकडून १ हजार ध्वज आणि   ओमेक्स कंट्रोल सिस्टिम  व 5 फिंगर्स बिझ प्रा. लि. या दोन कंपनीकडून प्रत्येकी  ५०० ध्वजाची खरेदी करण्यात आली. या सर्व ध्वज खरेदी करता ३ कोटी ९४ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात अथर्व हेल्थ टेक इंडिया प्रा.लि. या कंपनीकडून १ हजार पैकी ९०० ध्वज खरेदी करण्यात आले. आणि   ओमेक्स कंट्रोल सिस्टिम   या कंपनीकडून ५०० ऐवजी २६० व 5 फिंगर्स बिझ प्रा. लि. या  कंपनीकडून   ५००   ध्वजाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे २०००  ध्वजाच्या तुलनेत १६६० ची ध्वज खरेदी करण्यात आली आणि यासाठी ३ कोटी २७ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे (Hindustan Post Exclusive News)

कोणत्या भागात किती ध्वज लावले
के पूर्व विभाग : ३०० ध्वज
एच पूर्व विभाग : ३०० ध्वज
जी दक्षिण विभाग: ३०० ध्वज
डी विभाग : ८० ध्वज
ए विभाग : ३०० ध्वज
सी विभाग : २०० ध्वज
आर मध्य विभाग : १८० ध्वज

 

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.