Yavatmal Hindus : हिंदूंनी बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले; यवतमाळ येथील घटना

456
Hindus Economic Boycott : हिंदूंनी बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले; यवतमाळ येथील घटना
Hindus Economic Boycott : हिंदूंनी बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले; यवतमाळ येथील घटना

यवतमाळ शहरात केदारेश्‍वर मंदिर परिसरात २ सप्‍टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साजर्‍या होणार्‍या पोळा या सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील गुलशन-ए-रजा-ट्रस्‍ट या मुसलमानांच्‍या संघटनेने, ‘सर्वांना विनंती आहे की, आपल्‍या घरातील महिलांना पोळ्‍याच्‍या निमित्ताने भरणार्‍या बाजारात खरेदीसाठी पाठवू नका. सध्‍या वातावरण खराब आहे. तिथे छेडछाडही होते. त्‍यामुळे थोडे पैसे वाचावण्‍यासाठी या बाजारात महिलांना पाठवू नका’, अशा आशयाचे पत्रक वितरित केले. येथील बाजारात ९० टक्‍के मुसलमानांची दुकाने असूनही स्‍थानिक मुसलमान संघटनेने हे आक्षेपार्ह पत्रक काढले. (Yavatmal Hindus)

(हेही वाचा – Paris Paralympic Games : प्रीती पालला दुसरं पदक तर निशाद कुमारचं सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्य )

या संदर्भात हिंदूंनी संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या. यानंतर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी, ‘दरवर्षी अनेक मुसलमान या बाजारात त्‍यांचा व्‍यवसाय करतात; परंतु त्‍याच्‍या आड हिंदु महिला आणि भगिनी यांची छेडछाड होण्‍याच्‍या घटना प्रत्‍येक वर्षी घडतात. हा सण हिंदु धर्मियांचा आहे. त्‍यामुळे हिंदु माता आणि भगिनी यांना विनंती आहे की, आपण पोळ्‍यामध्‍ये खरेदीसाठी जातांना विशेष काळजी घ्‍यावी. या वर्षी पोळ्‍यात हिंदु बांधवांकडूनच खरेदी करावी. आपला सण आणि आपली माणसे जपावी. जो गोरक्षणासाठी झटतो, त्‍याच्‍याशी व्‍यवहार करून सण साजरा करावा; जेणेकरून आपली बहीण, आई, मुलगी सुरक्षित राहील’, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले.

 या पत्रकात शेवटी ‘ज्‍याच्‍या अंगी हिंदुत्‍व त्‍याच्‍याशी आमचे बंधुत्‍व !’ अशी ओळ लिहिली आहे. सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना या संदर्भात निवेदन देण्‍यात आले. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी या संदर्भात एक व्‍हिडिओही सामाजिक माध्‍यमावर प्रसिद्ध केला आहे. त्‍यात ते म्‍हणतात, ‘मुसलमानांना यात्रेत दुकाने लावण्‍याची अनुमती न देता पोस्‍टल मैदान येथे त्‍यांनी दुकाने लावावीत. जेथे वातावरण खराब आहे, त्‍या दुकानातून हिंदु महिलांनी खरेदी करू नये.’

हिंदुत्‍वनिष्‍ठांनी सडेतोड प्रत्‍युत्तर आणि निवेदन दिल्‍याने मुसलमानांनी क्षमा मागून नरमाईची भूमिका घेतली आहे. (Yavatmal Hindus)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.