Hindenburg Research: “नोटीसला उत्तर देण्याऐवजी आमच्यावरच आरोप लावताय” हिंडेनबर्गवर SEBI प्रमुखांचा पलटवार

126
Hindenburg Research:
Hindenburg Research: "नोटीसला उत्तर देण्याऐवजी आमच्यावरच आरोप लावताय" हिंडेनबर्गवर SEBI प्रमुखांचा पलटवार

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) गेल्या वर्षी अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील (Adani scam) आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यानतंर आता माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी एक निवेदन जारी करून हिंडेनबर्गच्या आरोपांचे खंडन केले आहे. हा सेबीच्या विश्वासार्हतेवर हा हल्ला असल्याचे म्हणत नोटीसला उत्तर देण्याऐवजी आरोप लावले जात असल्याचे माधबी पुरी बुच यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – वाहतूक पोलीस सय्यद Akshata Tendulkar यांना म्हणाले, बांगलादेशात १५-२० हिंदू मेले तर काय झाले? शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल)

सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) आणि त्यांचे पती धवल बुच (Dhaval Buch) यांनी रविवारी हिंडेनबर्गने केलेल्या गौप्यस्फोटानंतर स्पष्टीकरण दिलं. अमेरिकन संशोधन आणि गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा आणि अध्यक्षांच्या चारित्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सेबी प्रमुखांनी म्हटलं आहे. हिंडेनबर्गने शनिवारी जारी केलेल्या एका अहवालात, अदानी समूहाविरुद्ध सेबी कारवाई करत नसल्याचे म्हटलं आहे. यामागे  सेबी प्रमुख आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याशी संबंधित विदेशी निधीतील भागीदारी असू शकते, असा संशय हिंडेनबर्गने व्यक्त केला. त्यानंतर माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी संयुक्त निवेदन जारी केले.

(हेही वाचा – नागपूर ड्रग्जच्या विळख्यात; डीआयआरकडून मफेड्रोन (MD Drugs) चा कारखाना उदध्वस्त; ७८ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त)

नेमके आरोप काय?

हिंडेनबर्गच्या (Hindenburg) म्हणण्यानुसार, माधवी आणि त्यांच्या पतीने बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये ऑफशोअर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती. हे तेच फंड आहेत ज्यांचा वापर विनोद अदानी यांनी निधीचा अपहार करण्यासाठी आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला होता. विनोद अदानी (Vinod Adani) हे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचे मोठे बंधू आहेत.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.