Heat Wave : देशातील अनेक राज्यात पारा ४२ अंशावर जाण्याची शक्यता

वाढत्या उष्णतेचा (Heat waves) परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

123
Heat Wave : देशातील अनेक राज्यात पारा ४२ अंशावर जाण्याची शक्यता

राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक राज्यात तापमान ४५ अंशावर गेले आहे. देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Heat Wave: राज्यात तापमानाचा पारा वाढला; मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान (Heat Wave) ४२ अंश सेल्सिअल आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अकोला ४५.५ अंश, अमरावती ४५.४ अंश, वर्धा ४४.९ अंश, नागपूर ४४.३ अंश आणि यवतमाळमध्ये ४३.५ अंशाची नोंद झाली आहे. अशाप्रकारे बहुतांश जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) असल्यामुळे लोकं दुपारी घराबाहेर निघण्याचे टाळताना दिसत आहे. दरम्यान उष्णतेमुळे राज्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

हेही पहा – 

वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या

वाढत्या उष्णतेचा (Heat wave) परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचं तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे या केळीच्या बागा होरपळून निघत आहेत. केळीची पानं या तापमानामुळे (Heat waves) पिवळी पडत आहेत, तर काही पानं वाळली आहेत. केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं अनेक केळीची झाडं उन्मळून पडली आहेत, तर तापमान वाढल्यानं केळीच्या फळांवर काळे डाग पडत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.