Hawkers Action : फेरीवाल्यांवरील कारवाई सणांमुळे ठरणार नाही ना औटघटकेची

265
Hawkers Action : फेरीवाल्यांवरील कारवाई सणांमुळे ठरणार नाही ना औटघटकेची

मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई (Hawkers Action) सुरु असली तरी सध्या ही कारवाई प्रशासन मनापासून करते का? हे आता येत्या आठ दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. मुंबईकरांना होत असलेला फेरीवाल्यांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्याचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात ही कारवाईची नौटकी आहे की खरी कारवाई आहे हे येत्या दिवसांत दिसून येणार आहे. कारण येणारे दिवस सणांचे असून या सणाच्या नावाखाली फेरीवाल्यांना बसण्यास मुभा दिली जाण्याची शक्यता असून तसे झाल्यास पुन्हा एकदा दादरसह इतर रेल्वे स्थानकाच्या परिसर फेरीवाल्यांनी दाटून येणार आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोकळ्या वातावरणात चालता येणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा गर्दीतून वाट काढून चालण्याची वेळ येणार आहे.

(हेही वाचा – Drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून ५ हजार ५०० किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट)

मुंबई महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधातील कारवाई (Hawkers Action) तीव्र करण्यात आल्याने दादर, घाटकोपर, बोरीवली तसेच इतर रेल्वे स्टेशन आणि काही परिसर अशाप्रकारे २० ठिकाणे ही फेरीवाला मुक्त झाल्याची पहायला मिळत आहे. भागातील कारवाईमुळे फेरीवाला मुक्त परिसर झाल्याने एकप्रकारे नागरिकांकडून समाधान व्यक्त करत महापालिका प्रशासनाचे आभारही जनतेकडून मानले जात आहे. मात्र, आजवर महापालिकेच्या या कारवाईबाबत लोकप्रतिनिधी समाधान व्यक्त करत असले तरी आता हेच लोकप्रतिनिधी फेरीवाल्यांच्या समर्थनाथ आवाज उठवताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आता फेरीवाल्यांची बाजू मांडू लागले असून सन २०१४ च्या सर्वेमध्ये अर्ज भरलेल्या सर्वच फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा दिली जावी अशाप्रकारची मागणी होत आहे.

(हेही वाचा – अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर लागू होणार नाही, PM Narendra Modi यांचे आश्वासन)

मात्र, एका बाजूला लोकप्रतिनिधींकडून फेरीवाल्यांचे समर्थन आणि दुसरीकडे सणांचा येणारा काळ यामुळे फेरीवाल्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातू व्यवसाय करण्यास तात्पुरती परवानगी देऊन कारवाई स्थगित करावी यासाठी फेरीवाल्यांकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी सणाच्या काळात फेरीवाल्यांवरील कारवाई शिथिल करणाऱ्या प्रशासनाकडून येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात सध्या सुरु असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तसे झाल्यास सध्या सुरु असलेली कारवाई (Hawkers Action) येत्या काही दिवसांमध्ये थांबलेली दिसेल किंवा कारवाईत शिथिलता आलेली दिसेल. किंबहुना फेरीवाल्यांकडे महापालिका आणि पोलिस यांच्याकडून कानाडोळा करून फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास संधी देतील असे बोलले जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास महापालिकेकडून सुरु असलेली ही कारवाई केवळ नौटंकी आहे की खरोखरच जनतेला होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रशासन ही कारवाई करत आहे हे स्पष्ट दिसून येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.