Dadar Hawkers : दहा वर्षांपूर्वीच्या सर्वेमध्ये १११ पात्र मुस्लिम फेरीवाले, आज त्यांच्यामुळेच दादरमध्ये वाढले मुस्लिम

679
City Street Vendors Committee Election : गाळेधारक हे फेरीवाले कसे, फेरीवाल्यांकडूनच उपस्थित केला जातोय सवाल
  • विशेष प्रतिनिधी

मुंबईत नगर पथ विक्रेता समिती गठीत करण्यात येत असल्याने यासाठी होणाऱ्या १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांच्या निवडणुकीसाठी ३२ हजार ४१५ फेरीवाले मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. पात्र फेरीवाल्यांमध्ये दादर माहिम आणि धारावी या जी उत्तर विभागातील १५६५ मतदारांपैंकी १११ पात्र फेरीवाले हे मुस्लिम समाजाचे आहे. सन २०१४ च्या फेरीवाल्यांच्या सर्वेतील पात्र फेरीवाल्यांची संख्या ही सुमारे २२ हजार एवढी असून त्यात जी उत्तर विभागांतील पात्र फेरीवाल्यांपैंकी १११ मुस्लिम फेरीवाले असून मागील दहा वर्षांत या पात्र मुस्लिम फेरीवाल्यांच्या मदतीने ही संख्या आता दहा पटीने वाढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Dadar Hawkers)

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम -२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. मुंबईत १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी सुमारे २२ हजार ४८ फेरीवाले हे मतदानास पात्र ठरले आहे. त्यामुळे मुंबईतील नोंदणीकृत नगर फेरीवाला मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ एवढी असून हे सर्व मतदार टाऊन वेंडींगवर आपले सदस्य निवडून पाठवणार आहेत.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला; शपथ घेतली आणि ८ दिवसांत मोडली)

या मार्गांवरील मुस्लिम फेरीवाले अधिक

या नोंदणीकृत फेरीवाल्यांपैंकी महापालिकेच्या जी उत्तर विभागांत १५६५ फेरीवाले हे असून त्यात १११ पात्र फेरीवाले हे मुस्लिम समाजाचे आहेत. या १५६५ पात्र फेरीवाल्यांमध्ये १११ मुस्लिम समाजाचे असून यामध्ये सेनापती बापट मार्ग, छबीलदास गल्ली, रानडे मार्ग, जावळे मार्गांवर मुस्लिमांची संख्या अधिक आहे. त्याखालोखाल माहीम फाटक, धारावी आणि माहीम एल जे क्रॉस रोडवरही मुस्लिम फेरीवाले आहेत. विशेष म्हणजे माहीम फाटक, धारावी आणि माहीम एल जे क्रॉस रोड यावरील मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या ही दहा ते बारा एवढीच आहे. तर दादर पश्चिम भागातच सर्वांधिक ९० हून अधिक मुस्लिम फेरीवाले पात्र ठरले आहेत.

विशेष म्हणजे आज दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात असले तरी दहा वर्षांमध्ये ही संख्या दहा पटीने वाढली गेल्याने सध्या सेनापती बापट मार्ग, रानडे मार्ग, जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्गांवरील मुस्लिम फेरीवाले अधिक दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी पात्र ठरलेल्या मुस्लिम फेरीवाल्यांनी आपल्या समाजाच्या लोकांना व्यावसाय करण्यास संधी देत एकप्रकारे दादरमध्ये आपली ताकद वाढली आणि यामध्ये जमाल आणि शमशुद्दीने या दोघा भावांचा मोठा हातभार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व मुस्लिम समाजाचे फेरीवाले मुंब्रा, भिवंडी, कल्याण तसेच अन्य भागांमध्ये राहणारे असल्याचे बोलले जात आहे. (Dadar Hawkers)

(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Election : भाजपाचे जम्मू-काश्मीरसाठी ‘मिशन ६६’)

मनसेचा तीव्र विरोध

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना, मुळात आपल्याच लोकांनी त्यांना भाड्याने जागा दिल्याने त्यांनी धंदे थाटले आणि त्यानंतर स्वत:च जागा बळकावत धंदे थाटले. त्यामुळे आज मुस्लिम समाजाच्या फेरीवाल्यांची संख्या वाढतेय ही चिंतेची गोष्ट असली तरी दादर (Dadar Hawkers) भागात केवळ या भागातील लोकांनीच व्यवसाय करायला हवा. सध्या बाहेरुन येत जे मुस्लिम फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. जर तो मुस्लिम दादर माहिम भागातील असेल तर त्यांना आमचा विरोध नाही, पण बाहेरील मुस्लिमांना आणून त्यांना जागा भाड्याने देत व्यवसाय करण्यास उभे केले जात असेल तर मनसेचा तीव्र विरोध असेल आणि राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

माहिम विधानसभेच्या भाजपा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनीही सध्या दादरमध्ये ज्याप्रकारे वातावरण बिघडवण्याचा जो काही मुस्लिम समाजाचा डाव आहे, तो ओळखायला हवा, असे म्हटले आहे. जर दहा वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेमध्ये १११ मुस्लिम पात्र ठरतात, तर पुढे अजून सर्वे केला तर त्यात ही संख्या हिंदुंच्या बरोबरीची असेल, हा धोका ओळखायला हवा. त्यामुळे यापुढे तर महापालिकेने सर्वे करून त्यांना पात्र करून घेऊच नये. शिवाय कोणत्याही मराठी आणि हिंदु फेरीवाल्यांनी जासत पैशांच्या अमिषापोटी कोणत्याही मुस्लिम समाजाच्या लोकांना आपल्या जागा भाड्याने देऊ नये तसेच कुणी जर नवीन मुस्लिम व्यवसाय करत असेल तर त्याला त्वरीत विरोध करायला हवा. कारण भविष्यात आणखी दहा नवीन फेरीवाले तयार करेल. त्यामुळे दादरमध्ये जर हिंदुंना टिकायचे असेल तर या समाजाच्या लोकांना रोखायला हवेच, पण तो जर दादरचा स्थायिक असेल तर त्याला व्यवसाय करण्यास आमचा विरोध नसेल हेही मी स्पष्ट करते असेही त्या म्हणाल्या. (Dadar Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.