Love Jihad फोफावण्यामागे मुली, पालक आणि समाजही कारणीभूत

132

मागच्या आठवड्यात उरणमध्ये हिंदूंना हादरवणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी यशश्री शिंदे नावाच्या हिंदू तरुणीची दाऊद शेख नावाच्या धर्मांध आणि वासनांध मुसलमानाने निर्घृण हत्या केली. हे लव्ह जिहादचे प्रकरण पहिले नाही. मागच्या दोन वर्षांपूर्वी श्रद्धा वालकरच्या हत्येपासून आजपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला तरी शेकडो उदाहरणे देशभरातील लव्ह जिहादची घडल्याचे दिसून येत आहेत. यावरून हिंदू मुलींचे या घटनांमधून डोळे उघडत नाहीत, हेच दुर्दैवाने सिद्ध होत आहे. असे का होते, मुली लव्ह जिहादच्या सापळ्यात का अडकतात? याची कारणमिमांसा समजून घेतली पाहिजे.

हिंदू मुलींच्या अयोग्य कृती आणि अज्ञान

मुसलमान मुलांवर पटकन विश्वास ठेवणे : ‘एका पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानाने सांगितले, ‘‘हिंदू मुलींना फसवणे सोपे असते; कारण त्या भोळ्या असतात आणि कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. त्यांच्याशी गोड बोलून त्यांची खोटी स्तुती केली की, त्यांना आम्ही ‘जिहादी’ त्यांचेच वाटतो.

मुलींचे अल्लड वय : ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या बहुतेक हिंदू मुली या १३ ते १८ वर्षे वयोगटातीलच असतात. या अल्लड वयातील मुलींना मुसलमान फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात. त्या मुली अल्पवयातील लैंगिक आकर्षणामुळे ‘काय चांगले अन् काय वाईट’ यांतील भेद जाणत नाहीत. त्यामुळे त्यांचा पाय प्रेमात घसरतो.

मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याशी विवाह करणे : काही हिंदू युवतींना इस्लामी क्रौर्याचा इतिहास ज्ञात असतो; पण ‘एका तरी मुसलमानाला आपण राष्ट्रीय प्रवाहात आणून त्याची मानसिकता पालटू शकतो’, असा गैरसमज त्या अननुभवी वयात करून घेतात आणि स्वतःचा घात करून घेतात.

मुसलमानांना पौरुषत्व असलेले आणि हिंदूंना पौरुषत्वहीन समजणे : ‘मुसलमानांच्या प्रेमपाशात अडकलेल्या मुलींचे प्रबोधन करायला गेले, तर त्या ‘‘मुसलमान पौरुषत्व असलेले (मर्द) आहेत, तर हिंदू ‘नामर्द (पौरुषत्वहीन) असतात’’, असे सांगून हिंदूंच्या पुरुषार्थालाच आव्हान देतात.

हिंदू धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे : हिंदू मुलींना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे, हेही त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अशा मुलींकडून धर्मपालन केले जात नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माविषयी अभिमान नसतो आणि म्हणूनच त्या परधर्मात जाण्यास सिद्ध होतात.

(हेही वाचा ठाकरे-फडणवीस वादावर Ajit Pawar यांची टिप्पणी; आता एकमेकांचे कपडे काढायचे बाकी ठेवले…)

हिंदू पालकांच्या अयोग्य कृती

मुलींना अनिर्बंध स्वातंत्र्य देणे : पालकांकडून हिंदू मुलींना दिले जाणारे अनिर्बंध स्वातंत्र्य आणि त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी दिली जाणारी मुभा, यांमुळे त्या मुली पालकांना पुढे पुढे जुमानत नाहीत.
मुलींना भावनिक आधार देण्यास अपयशी ठरणे : ‘एका सर्वेक्षणानुसार एकट्या किंवा अलीप्त रहाणाऱ्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्या मुलींना भावनिक आधार मिळत नाही, त्या मुली तो आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलीला तिच्या डोक्यावर हात फिरवून आस्थेने चौकशी करणारे आणि तिचे बोलणे ऐकणारे पालक हवे असतात.

हिंदू समाजाच्या अयोग्य कृती

‘मला काय त्याचे’ अशी वृत्ती : ‘एका हिंदू घरातील मुलगी मुसलमानाने पळवून नेल्यावर ‘आपल्या घरातील मुलीबाळी तर सुरक्षित आहेत ना? मग कशाला करायचा विचार?’, असा विचार अन्य हिंदूंच्या मनात असतो.’

धर्मनिरपेक्षतेचा अतिरेकी विचार करणे : ‘मुसलमान पळवत असलेल्या हिंदू तरुणींचा टाहो हिंदू समाजातील काहींना ऐकूच येत नाही; कारण त्यांनी न वितळणारे धर्मनिरपेक्षतेचे उष्ण शिसे कानांच्या दोन भोकांत ओतून घेतलेले असते.

हिंदु धर्मावरील संकटांविषयी काही देणे-घेणे नसणे : हिंदू समाज आपापसांत भांडण्यात वा एकमेकांची उणी-धुणी काढण्यात मोठेपणा मानतो. वेगवेगळ्या हिंदू संघटनांमध्ये स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो. हिंदु धर्म आणि त्याच्यावर आलेली संकटे यांविषयी त्याला काही देणे-घेणे नसते.’

पळवून नेलेली मुलगी परत आणण्याचे धाडस न दाखवणे : ‘मुसलमान युवकाने मुलगी पळवून नेली, तर तिला सोडवून आणण्याची धमक हिंदू समाज दाखवत नाही. हरणांच्या कळपावर आक्रमण करून त्यातील उमदे हरीण त्या कळपासमोरच वाघ हिंस्रतेने फाडतो आणि फस्त करतो; परंतु अगतिकतेने ते पाहत बसण्यापलीकडे त्या कळपास काहीच करता येत नाही. तशीच अवस्था हिंदू समाजाची झाली आहे. ‘पोरगी माझ्यासाठी मेली’, असे म्हणून हात झटकून आपल्या कामकाजात व्यग्र राहाणे, यात कोणताही पुरुषार्थ नाही. `लव्ह जिहाद’च्या कथा ऐकून हिंदू समाजातील बहुतांशांच्या मुठी आवळतात; पण त्याविरुद्ध संघटितपणे लढा देण्याची मानसिकता कोणीही दाखवत नाही.’

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.