Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग शुल्कापोटी २१.९४ लाखांची थकबाकी

दादर रेल्वे वसाहतीची थकबाकी १६ लाख

105
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग शुल्कापोटी २१.९४ लाखांची थकबाकी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Accident) सद्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या भावेश भिंडे यांच्या मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एप्रिल २०२४ पासून होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत २१.९४ लाख रुपयांची थकबाकी अदा न केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपर आणि दादर येथील होर्डिंगचे अदा केलेले आणि प्रलंबित भाड्याची माहिती विचारली होती. मुंबई रेल्वे पोलिसांनी तब्बल एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रक्कमेची माहिती दिली. जून २०२२ पासून मार्च २०२४ पर्यंत मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २ कोटी ८१ लाख ७४ हजार २९ रुपये अदा केले. प्रति महिना १३, ३१, २०० असे शुल्क होते. मार्च २०२४ चे शुल्क १० लाख रुपये दोन धनादेश द्वारा जमा केले. पहिला धनादेश ६ मे २०२४ तर दुसरा धनादेश ७ मे २०२४ चा होता. मार्च २०२४ महिन्याचे ३ लाख ३१ हजार २०० रुपये अदा केले नाही. एप्रिल २०२४ चे शुल्कही अदा केले नाही. १३ मे रोजी होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत एकूण २१ लाख ९४ हजार ८८० रुपये थकबाकी आहे.

(हेही वाचा – Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू)

दादरची थकबाकी १६ लाख

दादर रेल्वे वसाहत येथील होर्डिंगचे शुल्कही मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकविले आहे. फेब्रुवारी २०२४ पासून १२ मे २०२४ पर्यंतची थकबाकी १६ लाख ४ हजार ९३६ रुपये इतकी आहे. येथील शुल्क हे प्रति महिना ५ लाख २९ हजार १०० रुपये इतके होते. (Ghatkopar Hoarding Accident)

अनामत रक्कम ४० लाख

सुदैवाने मुंबई रेल्वे पोलिसांनी मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून घाटकोपर येथील होर्डिंगसाठी अनामत रक्कम ४० लाख आकारली होती. यामुळे एकूण ४० लाख अनामत रक्कम जमा आहे. दादर पोलीस वसाहत येथील होर्डिंगसाठी जमा असलेल्या अनामत रक्कमेची माहिती दिली नाही.

(हेही वाचा – काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला उद्धव ठाकरे दिल्लीत; Ashish Shelar यांचा हल्लाबोल)

शुल्क अदा करण्यातही दिरंगाई

मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे अदा करण्यात आलेल्या शुल्क रक्कमेचा धनादेश दिनांक लक्षात घेता शुल्क अदा करण्यात दिरंगाई होत होती. पण तरीही मुंबई रेल्वे पोलिसांनी प्रलंबित रक्कमेवर एकही दमडीचे व्याज आकारणी न करता मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मेहरबानी केली असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.