भारताचे प्रवेशद्वार असलेल्या Gate Way Of India ला मिळणार नवी चकाकी

96
मुंबईचे ताजमहाल समजले जाणारे  गेटवे ऑफ इंडिया (Gate Way Of India) लवकरच वेगळ्या रंगात आणि शैलीत दिसणार आहे. वास्तविक भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया (Gate Way Of India Mumbai) या संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनासाठी ७१ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीस सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता गेटवेच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे (Gateway of India Mumbai repair) काम करण्यात येणार आहे. (Gate Way Of India)
गेटवे ऑफ इंडिया या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्तीच्या कामासाठी सरकारने ८ कोटी ९८ लाख २९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार या कामाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर मे. एम देवांग कन्स्ट्रक्शन मुंबई (May M Devang Construction Mumbai) यांच्या कमीतकमी रकमेच्या निविदेला आणि वाढीव निविदेमुळे ९ कोटी ३७ लाख ८३ हजार इतक्या रकमेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत या स्मारकाच्या जतन आणि दुरुस्तीच्या कामासाठी ६० लाख ६१ हजार ३५७ रुपये आणि वास्तुविशारदाचे मानधन ११ लाख ३ हजार ७२४ असे एकूण ७१ लाख ६५ हजार ८१ इतक्या रकमेला सरकारने मान्यता दिली आहे.
(हेही वाचा – Accident News: गोंदियात शिवशाही बस उलटली; ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता)
गेटवे ऑफ इंडियाच्या भिंती (Gateway of India wall), घुमट, कठड्यांची किरकोळ दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. त्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे काम पुरातत्त्वीय निकषांनुसार आणि मानकांनुसार पूर्ण करण्याची जबाबदारी संचालकांवर तसेच संबंधित संवर्धन वास्तू विशारद यांच्यावर आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.