Ganeshotsav 2024 : सार्वजनिक गणेशोत्सवातून पारंपारिक चलतचित्रे झाली गायब

1342
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईतील गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) आता मोठ्याप्रमाणात साजरा व्हायला लागला असून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांची संख्या वाढत आहे. परंतु जिथे एकेकाळी सजावटीमध्ये चलतचित्राच्या माध्यमातून पौराणिक कथा तथा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात होता, तिथे या पारंपारिक चलतचित्रांचा विसर गणेश मंडळांना पडलेला पहायला मिळत आहे, पूर्वी सावर्जनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीमध्ये उत्सव साजरा करताना या सजावटीमध्ये चलतचित्रे असल्याने नागरिक वेळात वेळ काढून गणपती दर्शनासह या चलतचित्रे पहाण्यासाठी जात असत. त्यामुळे मंडळांच्या मंडपापुढे रांगा लागलेल्या दिसून यायच्या. परंतु आता पौराणिक कथांच्या माध्यमातून भावी पिढीला त्याचे ज्ञान व्हावे तसेच आजच्या परिस्थितीला अनुकूल जनजागृती करावी अशाप्रकारचे पाऊल कोणत्याच मंडळांकडून उचलले जात नसल्याने चलतचित्रांची परंपराच खंडित झाल्याचे दिसून येत आहे. (Ganeshotsav 2024)

एके काळी लालबागच्या आसपास राहणारे तसेच अणि मुंबईतील इतरही काही भागांतील नागरिक हे सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे…! यात परळच्या लाल मैदानापासून सुरु होणाऱ्या मंडळाच्या गणपतीपासून ते नरेपार्क, लालबाग मार्केटचा गणपती, गरम खाडा, गणेश गल्ली, तेजूकाया, रंगाली बदक चाळ, चिंचपोकळी लेन, या सर्व मंडळांमध्ये चलतचित्रे सादर केली जायची. गणेश सजावटीमध्ये चलतचित्रेच प्रमुख आकर्षण असायची आणि रांगेतील ठराविक लोकांनाच मंडपात प्रवेश देऊन गणपती दर्शन झाले की या चलतचित्रांचे शो दाखवला जात असे, त्यानंतर रांगेतील दुसऱ्या लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जायचा. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – BMC Hospital : नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा आरोप : त्या सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन)

परंतु आता गणपती मंडळे आणि गणपती मोठे होऊ लागले आहे. उंचच उंच मूर्ती हेच आता आकर्षण राहिले असून प्रसिध्द मंदिरांच्या प्रतिकृती, गड किंवा अन्य कुठल्याही थिमवर सजावट केली जाते. मात्र, या सजावटीमधून चलतचित्रांतून दाखवला जाणारा देखावाच हद्पार झाला आहे. काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, आणि त्यांची प्रदर्शनेही लुप्त झाली. (Ganeshotsav 2024)

सजावटीतील चलतचित्रांतून सणांचे महत्व जपताना भावी पिढीला पौराणिक कथा दाखवल्या जात होत्या, तसेच विविध विषयांवर जनतेचे समाजप्रबोधन करण्यासाठी सामाजिक प्रश्न मांडले जात होते. ज्यामुळे गणपती दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांना बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर घरी जातात वेगळाच आनंद दिसून येत असे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.