Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त

88
  • प्रतिनिधी

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असतानाच हा गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केला आहे.

(हेही वाचा – National Teacher Award 2024 : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार)

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. दीड दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जन, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी असा ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) साजरा करण्यात येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील सर्व बारीकसारीक हालचालींवर नजर ठेवण्यासोबत संशयास्पद वस्तू, व्यक्ती, वाहने यांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, गणेशोत्सव मंडळ परिसरासह गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवत गस्त वाढवली आहे.

(हेही वाचा – Adarsh ​​Teacher Mayor Award : महापालिकेच्यावतीने ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२३-२४’ जाहीर)

वाहतूक पोलिसांनी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (कोस्टल रोड) २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला असून उत्तर मुंबईतुन दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मुंबईतुन उत्तर मुंबईमध्ये जाणाऱ्या वाहन चालकांनी गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त कोस्टल रोड वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. तसेच, पोलिसांनी विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करत काही मार्ग बंद करत काही मार्ग एकदिशा आणि काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.