Ganeshotsav 2024 : सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींची संख्या १३२ ने घटली, घरगुती गणपतींची संख्या ५ हजारांनी वाढली

346
Ganeshotsav 2024 : सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींची संख्या १३२ ने घटली, घरगुती गणपतींची संख्या ५ हजारांनी वाढली
  • सचिन धानजी, मुंबई

श्री गणरायांचे आगमन झाल्यांनतर मागील अकरा दिवस बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. घरोघरी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांच्यावतीने प्रतिष्ठापना केलेल्या बहुतांशी गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मूर्तींच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. मागील गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) १०,५०१ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या तर यंदा हे प्रमाण कमी होऊन १०,३६९ एवढे झाल्याचे दिसत आहे. त त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींमध्ये १३२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. तर घरगुती गणेश मूर्तींच्या संख्येत मात्र ५,०९२ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गौरी सह घरगुती आणि सार्वजनिक २ लाख ०५ हजार ७२२ एवढी होती तर यंदाच्या उत्सवात या सर्व मूर्तींची संख्या २ लाख ०९ हजार २१ एवढी दिसून आली.

WhatsApp Image 2024 09 17 at 5.22.42 PM

(हेही वाचा – Assembly Election : मुख्यमंत्रिपदासाठी उबाठाची तडजोडीची तयारी; काँग्रेसचा १०५, शरद पवार गटाचा ८८ जागांवर दावा!)

कोविड काळात अनेक भाविक गावी जाऊ न शकल्याने त्यांनी मुंबईच्या निवासस्थानी बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता सर्व सुरळीत झाल्यानंतर पुन्हा आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना गावी मूळ घरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश मूर्तींची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनापर्यंत एकूण गौरींसह एकूण २ लाख ०९ हजार ०२१ एवढ्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे दिसून येत आहे. यात गौरी आणि हरतालिका यांची संख्या ६ हजार ७५८ एवढी आहे तर घरगुती गणपतींची संख्या १ लाख ९१ हजार ८९४ एवढी आहे तर सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या १० हजार ३६९ एवढी आहे. मागील वर्षी एकूण प्रतिष्ठापना झालेल्या गौरींसह गणपतींची संख्या २ लाख ०५ हजार ७२२ एवढी होती, यात घरगुती गणेश मूर्तींची संख्या १ लाख ८६, हजार ८०२ तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची संख्या १० हजार ५०१ होती. (Ganeshotsav 2024)

WhatsApp Image 2024 09 17 at 5.23.03 PM

(हेही वाचा – Kolhapur Rape Case : कोल्हापूर पुन्हा हदारलं! पगारवाढीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)

त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्सवात घरगुती गणेश मूर्तींच्या संख्येत ५०९२ ने वाढ झाली आहे तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींमध्ये १३२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची सख्या ५०० ने वाढली होती, पण यंदा हे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. तर गौरी आणि हरतालिका यांच्या संख्येतही मागील वर्षीच्या तुलनेत १६६१ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. (Ganeshotsav 2024)

WhatsApp Image 2024 09 17 at 6.37.57 PM

(हेही वाचा – Noise Pollution : मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर कमी, तरीही वाढली आवाजाची पातळी)

सन २०२४ आणि सन २०२३ मधील गणेश मूर्ती विसर्जन
  • सार्वजनिक गणेश मूर्ती : १०,३६९ (सन २०२३ : १०,५०१)
  • घरगुती गणेश मूर्ती : १,९१,८९४ (सन २०२३ : १,८६,८०२)
  • गौरी, घरगुती, सार्वजिक एकूण मूर्ती : २,०९,०२१ (सन २०२३ : २,०५,७२२)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.