Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवातील देखाव्याच्या माध्यमातून उलगडला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट

89
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवातील देखाव्याच्या माध्यमातून उलगडला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवातील देखाव्याच्या माध्यमातून उलगडला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट

गावखडी येथील चारुदत्त व महेश धालवलकर हे दोघे भाऊ गेली दहा वर्षे गणेशोत्सवामध्ये (Ganesh Festival) विविध प्रकारचे देखावे सादर करून समाजजागृतीचे काम करीत आहेत. प्रत्येक देखाव्यातून समाजप्रबोधन व्हावे, हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. यंदा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीचा देखावा सादर केला आहे. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Jammu-Kashmir विधानसभा निवडणुकीवर आतंकवादाचे सावट)

घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी काम करीत असताना जहाल हिंदुत्वाची विचारसरणी रुजवून हिंदूसंघटन (Hindu Community) करीत असताना वीर सावरकरांना (Veer Savarkar) अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या या कार्याची माहिती नवीन पिढीला समजायला हवी आणि त्यांचा आदर्श सर्वांना घेता यावा, यादृष्टीने स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर यांचा जीवनपट, संघर्ष, त्यांनी देशहितासाठी कोणते कार्य केले, याची माहिती देणारा देखावा गावखडी (जिल्हा रत्नागिरी) येथील धालवलकर बंधूंनी केला आहे.

या देखाव्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात असताना सोसलेल्या यातना, त्यांना दिला जाणारा त्रास, जेलमध्ये पत्नीसोबत झालेले निर्वाणीचे बोलणे, बोटीतून पाण्यात मारलेली उडी आणि त्यानंतर सोसाव्या लागलेल्या यातना यावर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) दानशूर व्यक्ती भागोजीशेठ कीर यांच्याशी झालेल्या भेटीतून केलेले समाजोपयोगी काम याचाही देखाव्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी हा देखावा बनवण्यासाठी पुढाकार घेतला. देखावा साकारण्याचे काम एक महिना दहा दिवस सुरू होते. यासाठी शाडूची माती, पुठ्ठा व कागदांचा वापर करण्यात आला आहे. स्वा. सावरकरांचे चेहरे नंदकुमार लिंगायत, कागदाची गणेशमूर्ती ज्ञानेश कोटकर यांनी तयार केली. त्यामुळेच पर्यावरण पूरक देखावा करता आल्याचे बंधूंनी सांगितले.

सावरकरांच्या जीवनकार्याचा आलेख

घालवलकर बंधू याविषयी म्हणाले, या वर्षी आम्ही प्रथमच मोठा देखावा करण्याचे ठरवले. समाजात वावरत असताना सत्पुरुषांच्या समाजोपयोगी आणि आदर्शवत गोष्टी नवीन पिढीला समजाव्यात, या दृष्टीने जहाल हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याचा आलेख नवीन पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (Ganeshotsav 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.