Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्सवात ७ हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

93
Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्सवात ७ हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) शनिवारी (दि. ७) प्रारंभ होत आहे. पुणे पोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले असून, सात हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

(हेही वाचा – शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा)

उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधानांनी केला जलसंवर्धन लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ)

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. भाविकांचे मोबाइल, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस कार्यरत असणार आहेत. (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.