Thane – Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य

81
Thane - Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य
Thane - Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य

ठाणे आणि बोरिवली (Thane – Borivali Subway) मधील प्रवासाचे अंतर अवघ्या १२ मिनिटांवर आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पातील ठाणे महापालिकेकडील विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी नुकताच घेतला.

ठाणे – बोरिवली भुयारी मार्गाचे (Thane – Borivali Subway) काम एमएमआरडीए करीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले असून याचा बहुतांश भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे.

(हेही वाचा- Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देवून पाहणी केलेली आहे. त्यानुसार, परवानगीबद्दलचे विषय मार्गी लागतील. जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळा प्रवेश मार्ग आदी बाबींबाबत एकत्रित पाहणी करून लगेच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. (Thane – Borivali Subway)

भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली. त्यासंदर्भात, महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली. (Thane – Borivali Subway)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.