भातसातील पाणी पुरवठ्यासाठी आता Water Tunnel; मुंबई आणि कोलकाता मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीची निवड

1107
भातसातील पाणी पुरवठ्यासाठी आता Water Tunnel; मुंबई आणि कोलकाता मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीची निवड
  • सचिन धानजी, मुंबई

भातसा धरणातून मुंबईला येणाऱ्या दोन जलवाहिन्या कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असून याजागी भूमिगत जलबोगदा बनवण्यात येणार आहे. सुरुवातील हा जलबोगदा (Water Tunnel) बाळकुम ते मुलुंड नाक्यापर्यंत बांधण्यात येणार होता, परंतु आता हा जलबोगदा कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जलबोगद्याच्या कामासाठी ऍपकॉन्स इन्स्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीने मुंबईतील मेट्रो लाईन ४ व ५ चे बांधकाम तसेच कोलकाता मेट्रो रेल्वेचे काम केलेले आहे. त्यामुळे ठाण्याच्या खाडीखालून हा जलबोगदा जाणार असून खाडीखालून जलबोगदा बांधण्याचा अनुभव या कंपनीला आहे.

मुंबई महापालिकेच्या बॉम्बे २ आणि बॉम्बे ३ या दोन मुख्य जलवाहिन्या भातसा या धरणातून मुंबई शहरापर्यंत पाणी वाहून आणतात. या जलवाहिन्या कशेळी खाडीजवळ ठाणे या शहरात प्रवेश करतात आणि पुढे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस माजीवडे येथे भूमिगत होऊन पुढे मुलुंड जकात नाक्याजवळ हरी ओम नगर येथे मुंबई शहरामध्ये प्रवेश करतात. गेल्या काही दशकांमध्ये ठाणे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ठाणे शहरांनमधील या जलवाहिन्यांमुळे विविध विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) पत्रव्यवहार करून या दोन्ही जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याची विनंती वजा सूचना केली. त्यानुसार अपेक्षित वाढीव पाणी पुरवठ्याचा अभ्यास करून दोन्ही जलवाहिन्यांचे पाणी एक नवीन जल बोगदा बांधून त्यामध्ये वळवण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने ठाणे शहर परिसरात बाळकुम ते मुलुंड नाक्यापर्यंत जल बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार याचा सुसाध्यता अहवाल अभ्यासात हा बोगदा कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत बांधण्याचे नियोजित करण्यात आले आहे. (Water Tunnel)

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद झाला?)

भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन या जलबोगद्यातून २४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा जलअभियंता खात्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सल्लागार टीसीई यांनी आपला अहवाल सादर केला. यात सल्लागार टीसीई कंपनीने २४०० दशलक्ष लिटर पाणी वाहून नेण्याच्या या संपूर्ण बोगद्याचा व्यास साडेचार मीटर व्यास निश्चित केला आहे.या जलबोगद्यामुळे योग्यदाबाने पाण्याचा पुरवठा होईल आणि याद्वारे सर्वांत दूरपर्यंत आणि सर्वांत उंच भागापर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होईल असे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या कामांसाठी मागवलेल्या निविदेत ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड केली आहे, या कंपनीला विविध करांसह २८९६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ऍपकॉन्स या कंपनीने महापालिकेच्या अंदाज पत्रकाच्या उणे ५८ टक्के दर आकारला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरील लार्सन ऍड कंपनीने साडेतीन टक्के अधिकचा दर आकारला होता. या पात्र ठरलेल्या ऍफकॉन्स कंपनीने मुंबई मेट्रो रिजन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबईमधील मेट्रो लाईन ४ व ५ चे काम केले आहे तसेच कोलकाता मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड प्रत्येकी ३.८ मी व्यासाच्या जुळ्या बोगद्यांचे (Water Tunnel) बांधकाम केले आहे, या प्रकल्पात हुगळी नदीच्या खालून ५.५५ मीटर संपूर्ण व्यासाच्या बोगद्याचे काम केले आहे असल्याची माहिती प्रशासनाने नमुद केली आहे. (Water Tunnel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.