Navi Mumbai Fire : महापे येथे सात मजली इमारतीला भीषण आग

आग लागताच ५ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

25
Navi Mumbai Fire : महापे येथे सात मजली इमारतीला भीषण आग
Navi Mumbai Fire : महापे येथे सात मजली इमारतीला भीषण आग

नवी मुंबईत एका सात मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना रविवारी ( १५ ऑक्टोबर ) सायंकाळी घडली आहे. नवी मुंबईतील महापे पेट्रोलपंप शेजारी असलेल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. आग लागताच ५ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( Navi Mumbai Fire)

तिसऱ्या मजल्याला लागलेली आग ही वेगाने चौथ्या मजल्यावर पसरली. इमारतील विविध कंपन्यांच्या कार्यालयांना आग लागली आहे. या इमारतीला आग लागल्यानंतर इमारत परिसरात एकच खळबळ उडाली. तर या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली. तर सुट्टी असल्याने अनेक कार्यालय बंद होती,त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परते मुळे जवानांना इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

(हेही वाचा : RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.