Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक 

151
Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक 
Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक 

बांगलादेशातील (Bangladesh violence) राजकीय अस्थिरतेत लोक फसवणूक करून देश सोडून जाऊ लागले आहेत. दरम्यान, लखनऊ विमानतळावरून एका बांगलादेशी नागरिकाला (Bangladeshi citizen) अटक करण्यात आली आहे. जो भारतीय नागरिक असल्याची बतावणी करून बनावट पासपोर्टद्वारे (Fake Passport) थायलंडला जाण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र विमानतळ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बनावट पासपोर्ट आणि बनावट टुरिस्ट व्हिसाच्या (Fake tourist visa) मदतीने लखनऊहून थायलंडला जाण्याचा प्रयत्न करत होता. पण लखनऊ विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याच्या बनावट कागदपत्रांची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.

(हेही वाचा – पान-मसाल्‍याच्या जाहिराती करणारे मृत्‍यू विकतात; Actor John Abraham यांचे सडेतोड मत)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लखनऊहून बँकॉक, थायलंडला जाणाऱ्या फ्लाइटच्या (FD-147) प्रवाशांचे क्लिअरन्स लखनऊच्या चौधरी चरण सिंह विमानतळावरील टर्मिनल 3 वर केले जात होते. यादरम्यान इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आशिष राय या प्रवाशाला त्याच्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याच्या संशयावरून चौकशी केली. त्याच्या आधार कार्ड आणि पासपोर्टने पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील त्याचा पत्ता असल्याचा आढळून आलं, परंतु इमिग्रेशन अधिकारी राकेश कुमार यादव यांना वाटले की त्यात काहीतरी गडबड आहे. यानंतर त्याची कडक चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये ‘आशिष राय’ हा बांगलादेशचा असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – Bangladesh Violence : आतापर्यंत ५२ जिल्ह्यांत हिंदूंवरील हल्ल्याच्या २०५ घटना घडल्या)

बरुआने आपले नाव आणि पत्ता बदलून बनावट कागदपत्रांद्वारे पश्चिम बंगालच्या पत्त्यावर पासपोर्ट आणि आधार कार्ड बनवले होते. बरुआच्या सामानातून त्याचा बांगलादेशी पासपोर्टही (Bangladeshi passport) जप्त करण्यात आला आहे. स्टेशन प्रभारी शैलेंद्र गिरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शनिवारी सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.