डोळा मारणे हा विनयभंगच; Mumbai Mazgaon District Megistrate चा महत्वाचा निर्णय; आरोपीला सुनावलेली शिक्षा 

157

कोलकात्यामधील आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच दुसरीकडे बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्रामध्येही संतापाची लाट दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच देशभरातून वेगवेगळ्या भागांमधून लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या बातम्या समोर येत आहेत. असे असतानाच मुंबईमधील माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने (Mumbai Mazgaon District Megistrate) एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला पाहून डोळा मारणे हा विनयभंगच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण? 

हे प्रकरण 2022 मधील आहे. 5 एप्रिल रोजी 20 वर्षीय तरुणाने एका महिलेचा हात पकडून तिला डोळा मारला होता. हे कृत्य म्हणजे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे असल्याचे निरिक्षण न्यायालयाने (Mumbai Mazgaon District Megistrate) नोंदवले. भायखळ्यामधील आरोपीचे नाव मोहम्मद कैफ मोहम्मद शोहराब फरीक असे आहे. डॉकयार्ड रेल्वे स्टेशनसमोरील दुकानामध्ये तो कामाला होता. तक्रार करणाऱ्या महिलेने या दुकानामधून सामान खरेदी केले. या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी गेला होता. सामान घरात ठेवल्यानंतर ग्राहक महिलेने पावती मागितली. त्यावेळेस पावती देताना आरोपीने महिलेचा हात पकडला आणि तिला डोळा मारला. महिला जोरात किंकाळली आणि तिने आरडाओरड सुरु केला. आरोपी घाबरुन पळून गेला. महिलेने पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर भायखळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हा खटला तब्बल 2 वर्ष चालला. या प्रकरणामध्ये न्याय दंडाधिकारी आरती कुलकर्णींनी आरोपीला दोषी ठरवले आहे.

(हेही वाचा Sexual Assaulted : रत्नागिरीत 20 वर्षीय नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रुग्णालयाबाहेर निदर्शने )

काय शिक्षा ठोठावली? 

आरोपीचे वय आणि गुन्ह्याचा स्वरुप लक्षात घेत न्याय दंडाधिकाऱ्यांनी (Mumbai Mazgaon District Megistrate) त्याला कारवासाची शिक्षा न सुनावणात आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. आरोपीने पीडितेला 2 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या महिलेला तरुणाच्या कृत्यामुळे मनस्ताप झाल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवले. आर्थिक दंड भरल्यानंतर या तरुणाला समज देऊन सोडण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.