Varsha Gaikwad : साडेतीन महिन्यांनंतरही वर्षा गायकवाड यांचे महापालिकेच्या कारभारावर नाही लक्ष

36
Varsha Gaikwad : साडेतीन महिन्यांनंतरही वर्षा गायकवाड यांचे महापालिकेच्या कारभारावर नाही लक्ष
Varsha Gaikwad : साडेतीन महिन्यांनंतरही वर्षा गायकवाड यांचे महापालिकेच्या कारभारावर नाही लक्ष

मुंबई प्रदेश अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची निवड होऊन तब्बल साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटत आला आहे. मात्र, या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेतील विकासाचे तसेच अनियमित कारभाराचे अनेक मुद्दे समोर आलेले असतानाही गायकवाड यांनी आपण महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष असल्याचे वाटत असून या कालावधीमध्ये मुंबईच्या एकाही मुद्दयाला हात घातला नाही की पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या भोंगळ आणि अपारदर्शक कारभाराचा पर्दाफाश केला. त्यामुळे ज्या आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी गायकवाड यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली आहे, त्याच गायकवाड मुंबई अध्यक्ष म्हणून अयशस्वी ठरत असल्याची कुजबूज आता काँग्रेस पक्षातच ऐकू येत आहे. (Varsha Gaikwad)

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांना बाजुला करत जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धारावीतील आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षाने मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. मात्र, साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये गायकवाड यांना मुंबईतील एकाही मुद्द्यावर आंदोलन किंवा प्रशासनावर तोंडसूख घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच महापालिकेच्या विकासकामांमधील घोटाळा किंवा तिजोरीची सुरु असलेली लूट यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला नाही. यापूर्वीचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन करून काँग्रेस पक्षात जान आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच प्रत्येक आठवड्याला एक किंवा महिन्याला दोन ते तीन वेळा महत्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या कारभारावर टिका करण्याचेही काम केले होते. जगताप यांच्या काळात महापालिकेच्या कारभाराविरोधात जेवढ्या पत्रकार परिषद घेण्यात आल्या त्या तुलनेत वर्षा गायकवाड यांना साडेतीन ते चार महिन्यांच्या काळात एकही मुद्दा हाताळता आलेला नाही. (Varsha Gaikwad)

(हेही वाचा – Benefit Cooking Clay Pot : मातीच्या भांड्यात अन्न का शिजवावे, वाचा संशोधकांचे उत्तर)

वर्षा गायकवाड यांनी मुंबईची सुत्रे हाती घेताच माजी नगरसेवक सुप्रिया सुनील मोरे, पुष्पा कोळी, वाजिद कुरेशी, बब्बू खान, गंगा कुणाला माने, परमार, भास्कर शेट्टी आदींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेते प्रवेश केला. यामध्ये धारावीतीलच दोन माजी नगरसेवक आणि एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. यामध्ये बब्बू खान, भास्कर शेट्टी, परमार हे वर्षा गायकवाड यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैंकी होते. त्यामुळे एकप्रकारे गायकवाड यांच्यासाठी हा मोठा धक्का असून मुंबई अध्यक्ष बनल्यानंतर लागलेली गळती गायकवाड यांना रोखता न आल्याने ही नाराजी मोठ्याप्रमाणात उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक बोलावली होती. त्यामध्ये सन २०१२ व सन २०१७ मध्ये निवडून आलेले नगरसेवक, माजी खासदार, आमदार यांना निमंत्रित केले होते. या बैठकीमध्ये त्यांनी खेळाच्या मैदानांची जागा काळजीवाहू तत्वावर देण्याबाबत महापालिकेने बनवलेल्या धोरणाबाबत हरकती व सूचना नोंदवण्याची तयारी केली होती. (Varsha Gaikwad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.