Engineering Recruitment : महापालिकेत ६९० कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांच्या रिक्त जागांसाठी भरती, ११ नोव्हेंबरपासून अर्ज मागवणार

1850
Engineering Recruitment : महापालिकेत ६९० कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांच्या रिक्त जागांसाठी भरती, ११ नोव्हेंबरपासून अर्ज मागवणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याचे सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झालेले असून तब्बल ६९० पदांसाठीची जाहिरात प्रकाशित केली जात आहे. यासाठी येत्या ११ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये ही जाहिरात महापालिकेच्या संकेतस्थळार प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत अभियंता पदासाठी उमेदवाराकंडून अर्ज मागवण्यात येणार आहे.

महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेतील ही ६९० रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आचारसंहितेच्या आधीच याची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहिर केले होते. (Engineering Recruitment)

(हेही वाचा – Governor नियुक्त आमदार प्रकरणी महायुतीकडून महाविकास आघाडीवर कुरघोडी)

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, (सिव्हील)- २५० पदे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) – १३० पदे, दुय्यम अभियंता (सिव्हील)- २३३ पदे, दुय्यम अभियंता, (यांत्रिक व विद्युत) -७७ पदे पदे भरली जाणार आहे. या भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील,असा अंदाज आहे. या पदांसाठी अंदाजित १ लाख २५ हजार अर्ज प्राप्त होतील असे गृहीत धरून यासाठी १० कोटी ७५ लाख १२ हजार रुपयांचा सेवा शुल्क अंदाजित करण्यात आले आहे. यापूर्वी ६६४ रिक्त पदांसाठी होणारी ही भरती आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत निवृत्त होणऱ्या अभियंत्यांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. आचारंसहितेपूर्वी याची जाहिरात प्रकाशित करून यासाठी ११ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीमध्ये यासाठी अर्जं मागवले जात आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता वर्गासाठी सव्वा लाखांपर्यंत तर दुय्यम अभियंता पदासाठी सुमारे दीड लाखांपर्यंत पगार असेल, (Engineering Recruitment)

यासाठीची पदांसाठीची विस्तृत जाहिरात, शैक्षणिक अर्हता, परीक्षेचे स्वरुप व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती

(हेही वाचा – Maharashtra Assembly election मध्ये प्रथमच सहा राजकीय पक्ष उतरणार निवडणूक रिंगणात)

कुठे कराल अर्ज आणि कधी

मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in /for prospects/Careers-All/Recruitment/City Engineer या संकेतस्थळावर ११.११.२०२४ पासून उपलब्ध करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज सादर करावयाची लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्यानंतर, उपलब्ध लिंकवर विहीत वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ११.११.२०२४. (00:00:0१) ते ०२.१२. २०२४ (२३:५९: ५९) (Engineering Recruitment)

कोणत्या पदांसाठी किती असतील जागा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकूण पदे : २५०

गट  : क

वेतनश्रेणी : ४१,८००  रुपये ते १,३२,३०० रुपये अधिक भत्ते

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)

एकूण पदे :  १३०

गट : क

वेतनश्रेणी :  ४१,८००  रुपये ते १, ३२,३०० रुपये अधिक भत्ते

(हेही वाचा – Assembly Election : महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले)

दुय्यम अभियंता (स्थापत्य)

एकूण पदे : २३३

गट :  ब

वेतनश्रेणी : ४४,९०० रुपये ते १,४२,४००  रुपये अधिक भत्ते

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)

एकूण पदे :  ७७

गट :  ब

वेतनश्रेणी : ४४,९०० रुपये ते १,४२,४००  रुपये अधिक भत्ते (Engineering Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.