Israel मध्ये बांधकाम, तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

134
Israel मध्ये बांधकाम, तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
Israel मध्ये बांधकाम, तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील कुशल बेरोजगार युवक युक्तीना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने रोजगारासाठीची योजना स्वप्नांची क्षितिजे विस्तारली आहे. त्यामुळे अनेक कुशल युवकांना विदेशात रोजगाराची संधी मिळणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे.

(हेही वाचा – चर्चेची वेळ संपली, कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांनी पाकिस्तानला सुनावले)

बांधकाम क्षेत्रातील खालील कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधी
  • फेनवर्क / शटरिंग कारपेंटिग, लोखंड वाकवणे/बार बेन्डींग (शटरिंग काम), पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम)
  • नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात खालील कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधीवृध्दाची / आजारी व्यक्तींची काळजी देखभाल घेणे, इंजेक्शन, ड्रेसिंग इ. वैद्यकीय कामाचे कौशल्य इ, तात्काळ उपचार करण्याबाबतची माहिती
इच्छूक उमेदवारांसाठी पात्रता

इस्राईल मध्ये काम करण्याची इच्छा, उमेदवाराला जुजबी इग्रजी विषयाचे ज्ञान, क्षेत्रासंबधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र, किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट, किमान शिक्षण अट नाही, वयोमर्यादा प्रदीर्घ २५-४५ वर्षे, कोणताही प्रदीर्घ आजार नसावा.

इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी सपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येईल. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास अंदाजित रु.१ लाख ३७ पर्यंत मासिक वेतनाची संधी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी, कॉन्ट्रेक्ट कालावधी किमान ३ वर्ष, पुढील टप्यात यासह इत्तर क्षेत्रातील एक लाख कौशल्यधारकांना व युवतींना केअरगिबिग (Caregiving), नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी हेल्प लाईन १८००१२०८०४० येथे तात्काळ संपर्क साधावा, बांधकाम क्षेत्रातील इच्छूकांनी पुढील लिंकवर नोदणी करावी, असे कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी दुसाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

लिंक : https://t.Jy/FMYyR

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.