ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

61

महाराष्ट्रात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल आणि सोने-चांदीच्या दरात चढ-उतार, तर अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर आवक्याबाहेर जात असताना आता आणखी झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात महागाईच्या झळा सोसणाऱ्या वीज ग्राहकांच्या खिसा वीज दरवाढीने कापला जाणार आहे. या दरवाढीचा टाटा पॉवरच्या ग्राहकांना फटका बसणार आहे.

यासंदर्भात वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशीरा अदानी इलेक्ट्रिसिटी, टाट पॉवर आणि बेस्टच्या वीज दरवाढीला मंजूरी दिली असून ही दरवाढ शनिवारी पासून लागू झाली. परिणामी उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत असताना एसी, कुलर आणि पंख्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे तुम्हाला या उन्हाळ्यात जास्त विजबिल भरावं लागण्याची शक्यता आहे. तुमचे बजेट देखील कोलमडू  शकते. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रतियुनिटचा वहन आकार 1.47 रुपये होता. तो आता 2.21 रुपये होणार आहे. टाटा प्रतियुनिटचा वहन आकाप 1.47  वरून 1.68 रुपये एवढा झाला आहे. तर बेस्टच्या वीज वहन आकारातही 30 पैशांची वाढ झाली आहे. त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले; एकीकडे महाविकासची सभा दुसरीकडे भाजपाची सावरकर गौरव यात्रा)

दरम्यान मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, मुंबई शहरासाठी बेस्टने एमईआरसीकडे मागील थकबाकीसह 2023-24 आणि 2024-25 चे दर निश्चित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर जनसुनावणी घेतल्यानंतर आयोगाने आपला निर्णय जाहीर केला. त्याचा भार घरगुती ग्राहकांसह बहुतांश औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर पडणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.