दुबईला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग; नक्की काय घडले?

66

दुबईला जाणाऱ्या फेडेक्स एअरलाईन्सच्या कार्गो विमानाचे शनिवारी नवी दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानाला पक्षी धडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

यासंदर्भात विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुबईला जाणाऱ्या फेडेक्स कार्गो विमानाला उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याने धडक दिली. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. यावेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदींना पाचारण करण्यात आले होते. संपूर्ण आणीबाणीची घोषणा फक्त शनिवारी सकाळी ११ ते ११ वाजेपर्यंत होती. सध्या दिल्ली विमानतळावरील परिस्थिती सामान्य आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाला पक्षाची धडक ही सामान्य गोष्ट नसून यामुळे मोठ्या तांत्रिक बाबी उद्भवू शकतात. तसेच यामुळे अनेकदा दुर्घटना घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जातात. म्हणून खबरदारी घेणे गरजेचे असते.

(हेही वाचा – परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर; 2030 पर्यंत भारताची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.