DRDO : डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएसची कोठडी

प्रदीप कुरुलकर (DRDO) यांना मंगळवार ९ मे रोजी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले.

161
DRDO : डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएसची कोठडी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवार ९ मे रोजी देण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले आहेत.

संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालक पदावर काम करत असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली. डीआरडीओचे संचालक हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने संचालकवर मोठी कारवाई केली आहे.

(हेही वाचा – पुण्यात DRDO संचालकाला अटक; हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला देत होता माहिती)

प्रदीप कुरुलकर (DRDO) यांना मंगळवार ९ मे रोजी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कुरुलकर यांची चौकशी तसेच चौकशीदरम्यान मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावेळी झालेल्या सुनावणीनंतर विशेष न्यायधीश एस. आर. नावंदर यांनी कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही पहा – 

निवृत्तीला सहा महिने बाकी असतांना (DRDO) ते हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.