Dhule Car Accident : धुळ्यात भीषण अपघात! पिकअप व्हॅन आणि ईको कारमध्ये धडक; ५ जण ठार, ४ गंभीर जखमी

164
Dhule Car Accident : धुळ्यात भीषण अपघात! पिकअप व्हॅन आणि ईको कारमध्ये धडक; ५ जण ठार, ४ गंभीर जखमी
Dhule Car Accident : धुळ्यात भीषण अपघात! पिकअप व्हॅन आणि ईको कारमध्ये धडक; ५ जण ठार, ४ गंभीर जखमी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा (Dhule Sindkheda Accident) तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको कारच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (Dhule Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ (Daswel Fata) रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव मालवाहतूक बोलरो पिकअपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. चार गंभीर गंभीर जखमी झाला आहे. जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – विरोधी पक्षाकडून देण्यात आली होती पंतप्रधान पदाची ऑफर; Nitin Gadkari यांचा गौप्यस्फोट)

दरम्यान, धक्कादायक म्हणजे पिकअप चालवणारा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. (Dhule Car Accident )

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.