Dharavi Masjid Demolition : धारावीतील अनधिकृत मशीद हटवण्याच्या कामाला सुरुवात

302
Dharavi Masjid Demolition : धारावीतील अनधिकृत मशीद हटवण्याच्या कामाला सुरुवात
Dharavi Masjid Demolition : धारावीतील अनधिकृत मशीद हटवण्याच्या कामाला सुरुवात

धारावी येथील बेकायदेशीर मशीद हटवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मेहबूब-ए-सुबानिया मशिद ट्रस्टकडूनच ही मशीद हटवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने मशीद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या गाडीवर हजारो धर्मांधांनी दगडफेक केली होती. मशिदीविरोधात वातावरण अत्यंत संतप्त झाल्यानंतर पालिकेने कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. (Dharavi Masjid Demolition)

(हेही वाचा – BCCI AGM : जय शाह यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार?)

या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्या अंतर्गत ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे. मेहबूब-ए-सुबानिया मशीद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मशिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्या वेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मशीद बांधली गेली, तेव्हा तिला तळघर आणि 2 मजले यांची परवानगी होती. नंतरच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला. तीन वर्षांपूर्वीपासून हे काम सुरू होते आणि आताच मशीद पूर्णपणे तयार झाली आहे. धारावी मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे पथक आल्यावर गोंधळ झाला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे. यापूर्वीही न्यायालयाने बेकायदा बांधकाम हटविण्यास सांगितले होते. त्या वेळीही बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसी आली होती, त्यानंतर ईदनंतर बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर बीएमसीचे पथक तेथे गेले. बीएमसी आल्यावर मस्जिद कमिटीने सांगितले की त्यांना ४ ते ५ दिवसांचा अवधी हवा आहे. त्या दरम्यान ते स्वतः बेकायदा बांधकाम हटवतील, त्यामुळे बीएमसीची टीम परतली. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Dharavi Masjid Demolition)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.