इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या अटकेनंतर बांगलादेशी सरकारला भारताने सुनावले खडेबोल

89
इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या अटकेनंतर बांगलादेशी सरकारला भारताने सुनावले खडेबोल
इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या अटकेनंतर बांगलादेशी सरकारला भारताने सुनावले खडेबोल

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरुद्ध लढा देणारे इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास (Chinmoy Krishna Das) ब्रम्हचारी यांना ढाका येथून देशद्रोहाचा आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशामध्ये दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू (hindu) रस्त्यावर उतरले. अशातच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. (Chinmoy Krishna Das)

( हेही वाचा : भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना आमचे पूर्ण समर्थन; Eknath Shinde म्हणाले…

बांगलादेशातील हिंदू समुदायाला कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा दास (Chinmoy Krishna Das) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते. यावेळी बांगलादेशी पोलिसांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी दास त्यांना अटक केली. त्यानंतर इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आणि ढाकातील भारतीय उच्चायुक्तांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच पराराष्ट्र मंत्रालयाने दास (Chinmoy Krishna Das) यांना जामीन न मिळाल्याने चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी आम्ही बांग्लादेशातील अधिकाऱ्यांना विनंती करतो. यामध्ये त्यांचे शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे,” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.” (Chinmoy Krishna Das)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.