Delhi Blast : दिल्लीत रोहिणीमध्ये सीआरपीएफ शाळेबाहेर स्फोट; नागरिक भयभीत

126
Delhi Blast : दिल्लीत रोहिणीमध्ये सीआरपीएफ शाळेबाहेर स्फोट; नागरिक भयभीत
Delhi Blast : दिल्लीत रोहिणीमध्ये सीआरपीएफ शाळेबाहेर स्फोट; नागरिक भयभीत

दिल्लीच्या रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेबाहेर २० ऑक्टोबर रोजी सकाळी मोठा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्फोटामुळे शाळेच्या जवळील काही वाहनांच्या काचा फुटल्या, तसेच मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. (Delhi Blast)

स्फोटानंतर तात्काळ पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आणि दिल्ली पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाचारण करण्यात आले. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकाऱ्यांकडून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

(हेही वाचा – Vidhansabha Election 2024 : मुंबईत १ लाख ६० हजार नवीन मतदार)

घटनास्थळाजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि अन्य सुरक्षा दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपास सुरू केला आहे मात्र कोणत्याही प्रकारचे गहिरे नुकसान किंवा जिवीतहानी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

स्फोटाच्या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला होता आणि स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि आपत्कालीन सेवा यांना कळवले. हा स्फोट अपघाती होता की हेतूपूर्वक घडवून आणला गेला, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

पुढील तपास सुरू असून स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कडक चौकशी सुरू ठेवली आहे. (Delhi Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.