Delay in OTP : १ डिसेंबरपासून तुम्हाला ओटीपी मिळायला खरंच उशीर होणार आहे का?

Delay in OTP : ट्रायने आता याविषयी एक पत्रक काढलं आहे 

100
Delay in OTP : १ डिसेंबरपासून तुम्हाला ओटीपी मिळायला खरंच उशीर होणार आहे का?
Delay in OTP : १ डिसेंबरपासून तुम्हाला ओटीपी मिळायला खरंच उशीर होणार आहे का?
  • ऋजुता लुकतुके

१ डिसेंबरपासून तुम्हाला कुठल्याही आर्थिक किंवा संस्थात्मक कामासाठी लागणारा ओटीपी यायला उशीर होईल अशी बातमी सगळ्या वृत्तपत्र आणि मीडियामध्ये पसरली होती. तुम्ही ऑनलाईन करत असलेल्या अनेक व्यवहारांसाठी सध्या ओटीपी विचारला जातो. त्यातून तो व्यवहार करणारी व्यक्ती तुम्हीच आहात अशी खात्री करून घेतली जाते. म्हणजे ऑनलाईन खरेदी करताना, बँकांची ऑनलाईन कामं करताना, तुम्हाला नेहमीच ओटीपी विचारला जातो. तुमच्या खात्याशी जोडलेल्या मोबाईल फोनवर हा ओटीपी येतो. त्यामुळे खात्री पटवता येते की, व्यवहार करणारी व्यक्ती तुम्हीच आहात. ओळख पटवण्याचा सुरक्षित उपाय म्हणून ओटीपीचा वापर सर्रास होतो. (Delay in OTP)

पण, आता ट्रायने वाढलेले स्पॅम कॉल आणि सायबर गुन्ह्यांसाठी होत असलेला फोनचा वापर याविरुद्ध पाश आवळण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठल्या नंबरवरून हे ओटीपी येत आहेत याची पडताळणी केल्याशिवाय कुठलाही कॉल, मग अगदी ओटीपीही पुढे पाठवण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कॉल किंवा संदेश कुठून आला आहे ते कळल्याशिवाय तो पुढे पाढवणार नाही अशी ट्रायची योजना आहे. पण, त्यामुळे हा गैरसमज पसरल्याचं आता समजतंय. (Delay in OTP)

(हेही वाचा- Manu Bhaker : मनु भाकर राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही, त्या कालावधीत करणार युरोपमध्ये सराव)

खुद्द ट्रायनेही ओटीपीला उशीर होणार असल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच फोन कॉलवर नियंत्रण असलेली सरकारी संस्था आहे. (Delay in OTP)

 लोकांना सायबर गुन्हेगार आणि स्पॅमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रायने एक नवीन नियम केला आहे. आणि त्यानुसार, प्रत्येक संदेश, कॉल हा कुठल्या स्त्रोतातून आला आहे हे ट्रायला समजावं यासाठी त्यांनी मोबाईल कंपन्यांना ही ओळख पटवण्याचे उपाय करण्यासाठी सांगितलं आहे. सुरुवातीला मोबाईल कंपन्यांना ३१ ऑक्टोबरचा मुदत देण्यात आली होती. पण, कंपन्यांनी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली. ती त्यांना देण्यात आली. आता मोबाईल कंपन्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असेल, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या यंत्रणांनी आपली ओळख मोबाईल कंपन्यांकडे पटवून दिली तर ओटीपीमध्ये उशीर होणार नाही, असं ट्रायने स्पष्ट केलं आहे. (Delay in OTP)

(हेही वाचा- Accident News: गोंदियात शिवशाही बस उलटली; ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता)

त्यामुळे डिसेंबरपासून ओटीपी यायला उशीर होणार नाही, असंच ट्रायचं म्हणणं आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.